शिरूर : महान्युज लाईव्ह
शिरूर तालुक्यात क्रांती संस्थेच्या वतीने लॉक डाऊन काळात पारधी समाजातील १५०० कुटुंबांना किराणा किट चे वाटप करण्यात आले.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना चे संकट सुरू आहे. या संकट काळात लॉकडाऊनमुळे अनेकांचे हाल होत आहेत.पारधी समाज हा भटक्या जमाती मध्ये मोडतो.अनेक जण छोटे छोटे व्यवसाय करत जगत असतात.
भटका समाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या समाजाकडे नेहमीच गुन्हेगारीच्या दृष्टिकोनातून पाहिले जाते. लॉक डाऊन काळात या कुटुंबाचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असल्याने ही बाब लक्षात घेत क्रांती संस्थेने आनंदवन,वरोरा येथील महारोगी सेवा समितीच्या माध्यमातून शिरूर व श्रीगोंदा तालुक्यातील पारधी समाजातील सुमारे १५०० कुटुंबांना किराणा किटचे वाटप करत मदतीचा हात दिला आहे.
याविषयी अधिक माहिती देताना सुनीता भोसले यांनी सांगितले की,शासनाकडून या समाजाची नेहमी अवहेलना होत असते.मदत मात्र कुठलीही मिळत नाही.सध्या यातील अनेक कुटुंबांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असून गुन्हेगारीकडे वळू नये.या समाजाला ही सन्मानाने जगता यावे यासाठी महिनाभर पुरेल इतके साहित्य या किट च्या माध्यमातून शिरूर व श्रीगोंदा तालुक्यात दिले जात आहे.यासाठी आनंदवन येथील संस्थेने विशेष सहकार्य केले असल्याचे त्यांनी सांगितले.
शिरूर तालुक्यातील तळेगांव ढमढेरे, मुखई, गणपती माळ येथे 530 किराणा किट चे वाटप करण्यात आले. यावेळी विकास जाधव,शास्त्री भोसले, टायगर भोसले, अमित केंगार, रिजवान बागवान आदी उपस्थित होते.











