बारामती ::महान्यूज लाईव्ह
10 जून रोजी जामिनावर बाहेर आलेल्या गुंड गणेश रासकर वर आज संध्याकाळी सात वाजता निरा मध्ये गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली.
रासकर यांच्यावर वेगवेगळे गुन्हे असून तो नुकताच जामिनावर बाहेर आला होता. पुरंदर तालुक्यातील नीरा येथे आज संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्याच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक आता घटनास्थळी दाखल झाले आहेत.
आज शुक्रवारी संध्याकाळी सात वाजता निरा येथील एसटी स्टँड नजीक गणेश रासकर हा पल्सर गाडी वर आला होता. त्याच्यावर दोन गोळ्या झाडण्यात आल्या आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्या पूर्वी त्याचा मृत्यू झाला











