दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड भाजपचे आमदार अॅड,राहुल कुल यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फड़णवीस यांच्या नेतृत्वात आज दिल्ली येथे मंत्री गटाचे अध्यक्ष, विद्यमान केंद्रीय गृहमंत्री व नवनियुक्त सहकारमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.
यावेळी विविध विषयांवर अमित शहा यांच्याशी चर्चा केली. देशाचे नवे केंद्रीय सहकार मंत्री म्हणून अमित शहा यांची नुकतीच केंद्रीय मंत्रीमंडळाने निवड केली आहे. याच पार्श्वभूमीवर आज दौंड भाजपचे आमदार राहुल कुल यांनी दिल्ली येथे जाऊन अमित शहा यांना शुभेच्छा दिल्या.
देशाच्या इतिहासात प्रथमच स्वतंत्र ‘सहकार मंत्रालय’ निर्माण करण्याचा निर्धार करीत या मंत्रीपदाचा कार्यभार स्विकारल्याने अमित शहा यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार जयकुमार गोरे हेही उपस्थित होते.











