बारामती : महान्यूज लाईव्ह
कन्हेरीपाठोपाठ बारामती तालुक्यातील काटेवाडीतही सामूहिक रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारे होमिओपॅथिक औषध संपूर्ण गावातील १८०४ कुटुंबांना मोफत वितरीत करण्यात आले.
कन्हेरीत दोन दिवसांपूर्वी आर्सेनिकम अल्बम-३० या माणसांची रोगप्रतिकारक शक्ती नैसर्गिकरित्या वाढण्यास मदत करणाऱ्या होमिओपॅथिक औषधांचे वितरण करण्यात आले. हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सौ. सुनेत्रा पवार यांनी काटेवाडीतील सर्व कुटुंबांपर्यंत हे औषध पोचवून संपूर्ण गावाची सामूहिक रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मदत करण्याचे आवाहन डॉक्टरांना केले होते. भवानीनगर येथील होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉ. राकेश मेहता यांनी या औषधाची माहिती दिली व हे औषध उपलब्ध करून दिले. गावचे सरपंच विद्याधर काटे, उपसरपंच धीरज घुले, शीतल काटे, प्रकाश काटे, दत्तात्रेय काटे, अॅड. संभाजी काटे, गावचे ग्रामसेवक बाळासाहेब भोईटे, डॉ. राकेश मेहता, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. मार्तंड जोरी आदी यावेळी उपस्थित होते. त्यानंतर गावचे ग्रामपंचायतीचे सदस्य व इतर पदाधिकाऱ्यांनी तसेच आशा स्वयंसेविकांनी हे औषध प्रत्येक कुटुंबापर्यंत पोचवले.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=165039231705551&id=111857893690352
गावातील दहा हजार लोकसंख्येपर्यंत हे औषध पोचविण्यात आल्याने त्याचा फायदा कोरोनाच्या साथीत होईल अशी अपेक्षा सरपंच विद्याधर काटे यांनी व्यक्त केली.











