अॅड. विजय सोनवणे महान्यूज लाईव्ह
नगर – कर्जत तालुक्यातील कुळधऱण येथील मोबाईल दुकानातून चोरट्यांनी २६ मोबाईल चोरले. त्यांची बाजारातील किंमत ५ लाख २० हजार रुपये होत होती..कर्जत पोलिसांनी आपल्या कौशल्याचा पूर्ण परीने कस लावत तीन चोरटे पकडले. त्या चोरट्यांनी तोपर्यंत पाच मोबाईलची वाट लावली होती. मात्र पोलिसांनी ४ ला रुपये किंमतीचे २१ मोबाईल हस्तगत करण्यात यश मिळवले.
११ जुलै रोजी कुळधरण गावात रस्त्याच्या कडेला असलेल्या प्रगती मोबाईल शॉपीमधून चोरट्यांनी दुकानाचे शटर उटकटून ५ लाख २० हजार रुपये किंमतीचे २६ मोबाईल चोरल्याची फिर्याद प्रमोद पोपट टव्हाण (रा. धालवडी, ता. कर्जत) यांनी कर्जत पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी तपास सुरू केला. या दरम्यान तांत्रिक तपासणी व गुन्ह्या्ंची पध्दत लक्षात घेत कर्जत पोलिसांनी तपास सुरू केला. यामध्ये खबऱ्यांनीही माहिती दिली व त्यानुसार ही चोरी बीड जिल्ह्यातील आष्टी तसेच करमाळा व कर्जत तालुक्यातील बेनवडी येथील संशयित चोरट्यांनी केल्याचा पोलिसांचा संशय बळावला. संशयितांचा शोध घताना हे आरोपी चिलवडी गावच्या शिवारातील एका वीटभट्टीवर काम करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांना ही बाब कळवली व त्यांच्या सूचनेनुसार कर्जतचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखऱ यादव या्ंच्या मार्गदर्शनाखाली पथके तैनात करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षीक सुरेश माने, फौजदार भगवान शिरसाठ, पोलीस अंमलदार अंकूश ढवळे, सुनिल माळशिखरे, पांडुरंग भांडवलकर, श्याम जाधव, सुनिल खैरे, गोवर्धन कदम, अमित बर्डे, गणेश भागडे, सागर म्हेत्रे, शकिल बेग, विकास चंदन, नितीन नरुटे यांच्या पथकाने आरोपी ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
पोलिसांनी साध्या वेशात जाऊन अगोदर पाळत ठेवली व त्या दरम्यान संशयित 1) पप्पू सर्जेराव गायकवाड, (वय 25 वर्ष, रा. धामणगाव, तालुका आष्टी, जिल्हा बीड), 2) सुरज बाळु गायकवाड, (वय 20 वर्ष, रा बेनवडी, ता कर्जत) यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली, तेव्हा त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले.
त्यांनी अधिक माहिती दिली की त्यांच्यासोबत आणखी दोन जोडीदार आहेत, ते खडकी ता. करमाळा येथील आहेत. सदर माहिती वरून खडकी येथे जाऊन 3) विकास कैलास घोलवड, रा. खडकी, ता. करमाळा यास मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. आणखी एकाचा शोध पोलिस घेत आहेत.
या संशयित आरोपींकडून गुन्ह्यातील चोरी केलेल्या २६ पैकी २१ मोबाईल हस्तगत केले असून त्याची किंमत ४ लाख २० हजार रुपये होत आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस अमलदार सुनील माळशिखरे, भाऊसाहेब यमगर, विकास चंदन हे करत आहेत.











