इंदापूर : महान्यूज लाईव्ह
कोरोनाच्या महामारीच्या काळात अनेक वंचित घटकापर्यंत त्यांची खरी गरज ओळखून जिल्हा परीषदेचे माजी सभापती प्रविण माने हे मदत करीत आहेत. नाभिक बांधव, भटक्या समाजानंतर आता रुग्णवाहिका चालकांना त्यांनी पीपीई किटचे वितरण केले.
इंदापूर तालुक्यात एकूण ८ आरोग्य केंद्रे आहेत, या आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्रांवर रुग्णांच्या तात्काळ सेवेसाठी प्रत्येकी १ अशा ८ रुग्णवाहिका आहेत. या रुग्णवाहिकांवरील चालक कोरोनाची भिती न बाळगता आपली कर्तव्यसेवा पार पाडत आहेत. या रुग्णवाहिका चालकांना पीपीई किटची आवश्यकता होती. ही आवश्यकता जाणून घेऊन प्रविण माने यांनी या चालकांना पीपीई किट उपलब्ध करून दिले. पळसदेव येथे आयोजित एका शिबीराच्या निमित्ताने हा उपक्रम पार पडला.
यावेळी आशा स्वयंसेविकांना देखील पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या माध्यमातून फेसशिल्डचे वितरण करण्यात आले. दरम्यान येथे झालेल्या आरोग्य शिबीरात वयाची साठी गाठलेल्या नागरिकांची रक्तदाब, रक्त, मधुमेह, कर्करोग तपासणी करण्यात आली.
यावेळी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब काळे, जिल्हा परीषदेचे माजी सदस्य हनुमंत नाना बनसोडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुरेखा पोळ, मेघराज कुचेकर, अनिल कुचेकर, डॉ मिलिंद यादव, निलेश रंधवे, पंकज काशीद, डॉ. चंदनशिवे आदी उपस्थित होते.
प्रविण माने, माजी सभापती जिल्हा परीषद – स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोनाच्या महामारीत आरोग्य खाते कर्तव्य बजावत आहे, त्यांच्यासाठी आता कितीही सुविधा दिल्या तरी त्या कमी पडणार आहेत. रुग्णवाहिकांच्या चालकांना पीपीई किटची अत्यावश्यक गरज होती.










