सासवड : महान्यूज लाईव्ह
सासवडमध्ये मटन पार्टीमध्ये दारू पिल्यानंतर किरकोळ वादातून एक खून झाला आणि नेपाळच्या निरंजन सहानीने सासवडच्या भगवान मारकडचा खून करून त्यांचा मृतदेह नाल्याच्या कडेला टाकून दिला. मात्र सहा दिवसात सासवड पोलिसांनी अथक तपास करत सहानीला नेपाळमधून ताब्यात घेतले..
सासवड पोलिसांकडे या संदर्भात छाया भगवान मारकड यांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात तक्रार दिली होती, कारण सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत बोरकर वस्ती परिसरात एका नाल्या शेजारी 9 जुलै रोजी भगवान मारकड यांचा मृतदेह आढळला होता. त्याच्या डोक्यात शस्त्राने वार करून त्याचा खून करण्यात आल्याचा संशय छाया मार्कड यांनी व्यक्त केला होता.
पोलिसांनी तपास करत असताना मारकड आणि सहानी यांचे कनेक्शन समोर आले. भगवान मारकड यांचे पंक्चरचे दुकान आहे. तर निरंजन हा फर्निचरच्या दुकानात काम करतो. निरंजन आणि मारकड हे दारू पिण्यासाठी एकत्र बसले होते. त्यानंतर त्यांच्यात वाद झाला.. राग अनावर झाल्याने निरंजन याने मारकड यंच्या डोक्यात लाकडी दांडके मारले त्यातच मारकड यांचा मृत्यू झाला.. संशय येऊ नये म्हणून त्याने मारकड यांचा मृतदेह नालीच्या कडेला टाकून दिला.. आणि नेपाळला आपल्या मूळ गावी धूम ठोकली…
पोलिसांचे एक पथक तात्काळ नेपाळच्या दिशेनं रवाना झाले. पोलीस नेपाळ बॉर्डरवर पोहोचेपर्यंत सहानी हा नेपाळमध्ये पोहोचला होता.. सासवड पोलिसांना आरोपी निरंजन सहानीला नेपाळमध्ये जाऊन अटक करणं शक्य नव्हते.. म्हणून पोलिसांनी मोबाईल कंपनीच्या नोडल ऑफिसरच्या मदतीने सहानीला मोठ्या शिताफीने नेपाळ सीमेवर बोलावले आणि तिथून सासवड पोलिसांनी सहानीला अटक केली..
मारकड यांचा 9 तारखेला खून झाला होता आणि सासवड पोलिसांनी 5 दिवसांत नेपाळला गेलेला आरोपी पकडला त्यामुळे सासवड पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. निरंजन सहानी याला न्यायालयासमोर हजर केले असता 19 जुलैपर्यंत पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप करीत आहेत.











