मुंबई : महान्यूज लाईव्ह
मंजेश्वर ब्रदर्स या नावाने यू ट्यूब वर अक्षरशः धिंगाणा घालणाऱ्या अर्जून आणि आरव या दोन गोड गोजिऱ्यांचा रुपेरी वाळूत हा व्हिडीओ सोशल मिडियात व्हायरल झाला आणि ग्रामीण भागात या गाण्याची धून सर्वांच्या फेसबुक, व्हाटसअपवर दिसू लागली. अवघ्या आठवड्यापूर्वी यू ट्यूबवर अपलोड केलेल्या या चॅनेलचे फक्त आठवड्यात १ लाख २८ हजार सबस्क्रायबर्स आहेत.
मंजेश्वर ब्रदर्सच्या गाण्यांनी जी धूम केलीय.. त्याचा एक व्हिडीओ
रुपेरी वाळूत माडाच्या बनात या मराठी गाण्याची स्टारमेकर्स सारख्या सॉप्टवेअरवरून पुन्हा आपल्या बोबड्या बोलात अवीट चव समोर आणणाऱ्या या दोन मुलांनी आज सोशल मिडियाला अक्षरशः वेड लावले.. या मुलांनी मागील आठवड्यापासून जरा होले, होले चलो मोरे साजना.. आकाशी झेप घेरे पाखरा, हाल कैसा है जनाब का, चला जाता हू किसी के धून मे.. आणि गोरे गोरे .. बाकी छोरे.. हे गाणे गायलेय…६ मे रोजी लॉकडाऊनच्या निमित्ताने या मुलांचा यू ट्यूब चॅनेल सुरू करण्यात आला. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.. या मुलांविषयी बाकी अधिक माहिती नाही..मात्र त्यांच्या गाण्यांनी सध्या पस्तिशीपुढील साऱ्यांनाच झिंग आणलीय हे मात्र नक्की…!










