पुणे : महान्यूज लाईव्ह
वाहन चोरीच्या प्रकरणातील संशयित दाम्पत्य आरोपींना पोलिस व्हॅनमधून पोलिस ठाण्यात नेत असताना पती-पत्नीने गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याला वाघोलीत धक्काबुक्की केली व वाहतूक पोलिसाला मारहाण करत अन्य एका पोलीसाच्या हाताचा चावा घेतला. या प्रकरणी महिलेस एकावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना वाघोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र समोर घडली. (Ladies bite and hit to police in wagholi)
याचा व्हिडिओ येथे पहा अथवा तांत्रिक अडचणींमुळे न दिसल्यास महान्यूज लाईव्ह फेसबुक पेजवर पाहू शकता..
पुणे जिल्ह्यातील वाघोली व परिसरामध्ये दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले असून अशाच एका संशयिताला चौकशीसाठी गुन्हे शाखा युनिट ६ च्या कार्यालयामध्ये पोलीस घेऊन निघाले होते. त्यावेळी संशयित आरोपी उद्धव भोसले व त्याच्या पत्नीने सरकारी कामात अडथळा आणत गुन्हे शाखेच्या युनिट सहा मधील पोलीस सचिन पवार यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली व हाताचा चावा घेऊन जखमी केले. उद्धव भोसले याच्या पत्नीने सचिन पवार यांना लाकडाच्या फळीने मारहाण केली. व पुणे नगर रोडवर झोपण्याचे नाटक करून वाहतुकीस अडथळा आणला. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याचा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून लोणीकंद पोलिस पुढील तपास करत आहेत.











