कोविड लॉकडाऊनमध्ये युवकांनी उत्स्फूर्तपणे घेतला सहभाग
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
काझड (ता. इंदापूर) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित रक्तदान शिबीरात ९० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
सणसरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत प्राथमिक आरोग्य उपकेंद्र काझड, काझड व शिंदेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. राज्याचे वनराज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या आवाहनावरून हे रक्तदान शिबीर घेण्यात आले. यामध्ये ९० रक्तदात्यांनी सुरक्षित अंतर ठेवत कोरोनाच्या नियमांचे पालन करीत रक्तदान केले.
यावेळी खुद्द राज्यमंत्री भरणे यांनी उपस्थित राहून रक्तदात्यांचे कौतुक केले व त्यांना प्रमाणपत्रे वितरीत केली.
पुण्याच्या ओम रक्तपेढीने रक्त संकलन केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, पंचायत समिती सदस्या सौ. शीतल वणवे, सामाजिक कार्यकर्ते सागर मिसाळ, काझडचे सरपंच अजित पाटील, शिंदेवाडीचे सरपंच सावता बोराटे, उपसरपंच सोमनाथ नरुटे, बाळासाहेब पाटील, बापुराव पाटील, तानाजी पाटील, पोलीस पाटील सुरेश पांढरे, नवनाथ नरुटे, श्रीराम सावंत, काझड व शिंदेवाडीतील स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते, सणसरच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश नागरगोजे, आरोग्य विस्तार अधिकारी दिलीप जगताप यांच्यासह अशोक कमळे, इर्षा सोलापुरे, अविनाश चौधर, प्रमोद पाठक, विनायक भडकवाड, पोपट देवकर, शांताराम काशिद, भारत देवकाते, पद्माकर धर्माधिकारी आदी आरोग्य खात्याचे कर्मचारीही यावेळी उपस्थित होते. या रक्तदान शिबीरात जिल्हा परीषदेच्या शिक्षक, माध्यमिक शिक्षकांनीही रक्तदान केले.











