महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
महाराष्ट्रात पहिल्या लाटेत आणि दुसऱ्या ला टेत देखील कोरु आणि हाहाकार माजवला अनेक हसतीखेळती कुटुंबे उद्ध्वस्त केली.. एका एका कुटुंबातील तीन तीन चार चार जणांचा मृत्यू झाल्याचे देखील आपण पाहिले आहे.. पण आता अत्यंत सुन्न करणारी घटना उत्तर प्रदेशमधील सुलतानपूर जिल्ह्यातील आहे. येथे एकाच कुटुंबातील तब्बल वीस जणांना कोरोनाची लागण झाली, अन् मिडीयापर्यंत बातमी पोचेस्तोवर तिचा ध चा मा झाला.. ला कोरोना ची लागण झाल्यानंतर एकाच कुटुंबातील वीस जणांचा मृत्यू झालाय अशी बातमी बाहेर चालवली..!
एका हिंदी माध्यमाने यासंदर्भातील वृत्त पहिल्यांदा दिले. यामध्ये कोरोनाने सुलतानपूर जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील 20 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. त्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीने त्याची दखल घेत चौकशीचे आदेश दिले. तेव्हा याच माध्यमाकडून काही वेळाने बातमी आली की, एकाच परिवारातील वीस जण कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत..!
गंमत म्हणजे हा परिवार महाराष्ट्रातून सुलतानपूर जिल्ह्यात आलेला असल्याची माहिती दिली जात आहे, परंतु महाराष्ट्रातील बड्या माध्यमांनी देखील याची बातमी ही वीस जणांचा मृत्यू झाला असेच दिली.











