संदीप मापारी पाटील बुलढाणा
बुलडाणा :- पुण्याहून पत्नीला नेण्यासाठी आलेल्या २२ वर्षीय पतीला सासरकडील मंडळींनी नव्या प्रकाराने मारहाण केल्याचा घृणास्पद प्रकार बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा येथून समोर आला आहे. जावयाच्या पार्श्वभागात मिरची पावडर व कारले खोचून मारहाण करण्यात आल्याची तक्रार जावयाने बोरखेडी पोलिसात केली असून, सासरकडील 11 जणांवर गुरुवारी रात्री गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यापैकी 4 जणांना अटक देखील पोलिसांनी केले आहे.
असा आहे प्रकार
पुणे जिल्ह्यातील जुन्नर कबाडवाडी येथील २२ वर्षीय पीडित विवाहित युवक हा त्याच्या पत्नीला घेऊन जाण्यासाठी ४ जुलैला बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा येथील कॉटन मार्केट नजीकच्या परिसरात आला होता. यावेळी मोताळा येथील रहिवासी आरोपी रामराव भाऊराव पवार, विजय रामराव पवार, रवी रामराव पवार, राजू रामराव पवार, विकास सर्जेराव पवार, देवकाबाई, छायाबाई, नंदाबाई, रेवाबाई, कलुबाई व देवानंद रामभाऊ मोहिते या ११ जणांनी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास पीडित युवकाचे हातपाय दोरीने बांधून अंगणात बांधून ठेवले व पीडित युवकाच्या अंगातील फुलपॅन्ट व अंडरवेअर काढून त्याच्या पार्श्वभागात मिरची पावडर व कारले खोचले. शिवाय शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी, केबलच्या वायरने पाठीवर व कंबरेवर अमानुषपणे मारहाण केली. त्यामुळे या जावयास लज्जा वाटून खूप वेदना झाल्या. अशी तक्रार पीडित युवकाने तक्रारी बोरखेडी पोलीस स्टेशन मध्ये दिली आहे.
याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी पीडित युवकाच्या तक्रारीवरून उपरोक्त ११ आरोपींविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला असून ४ लोकांना अटक करण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अशोक रोकडे करीत आहेत.
पीडित युवक व सासरकडील मंडळीत होते वाद-
मोताळा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ राहत असलेल्या रामभाऊ भाऊराव पवार यांच्या मुलीशी मे २०२० मध्ये लग्न झाले आहे. दरम्यान, मागील दोन ते तीन महिन्याआधी पासून पीडित युवक आणि त्याच्या पत्नीच्या वाद सुरू होते. म्हणून ती तेव्हापासून मोताळा येथे माहेरी राहत होती आहे. दरम्यान काही दिवसा अगोदर पीडित युवक काही लोक सोबत घेऊन सासरीकडील मंडळीसोबत वाद केले होते. त्यानंतर पीडित पती ४ जुलैला पत्नीला आल्यानंतर त्याच्यात आणि सासरकडील लोकांमध्ये वाद झाले.
आरोपींना १२जुलै पर्यंत पोलीस कोठडी
अशोक रोकडे,पोलीस उपनिरीक्षक मोताळा : पिडित पतीला मारहाण प्रकरणी सासरसह तीन आरोपींला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चौघांना सोमवारी १२ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.











