महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
प्रियसीने अचानक प्रेमाला नकार दिल्याने दोघांचा ब्रेक-अप झाला. पाच वर्षापासूनचे प्रेम संबंध अचानक संपल्याने प्रियकर संतापला. दुसऱ्याच दिवशी प्रेयसीच्या घरी गेला आणि प्रेयसीवर पहिली गोळी चालवली. तिच्या मदतीसाठी आलेल्या मामावर ही चालवली; आणि गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर धावलेल्या शेजाऱ्यावरही चालवली. एकाच वेळी तिघा जणांचा जीव घेतल्यानंतर प्रियकराला ही घटनेची जाणीव झाली आणि त्याने स्वतःचाही जीव संपवून टाकला!
मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील आमला परिसरातील ही घटना! या घटनेत बरखा सोनी, बंटी, लकी पाल आणि भानू ठाकूर अशा चौघा जणांचा मृत्यू झाला शनिवारी 10 जुलै रोजी ही घटना बैतूल जिल्ह्यातील आमला परिसरात घडली.
भानू ठाकूर आणि बरखा हिचे मागील पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधाला वादाची झालर लागली. काही दिवसांपासून दोघांमध्ये भांडणे सुरु होते. त्यातच भानू ठाकूर याने 9 जुलै रोजी प्रियसीने धोका दिल्याचा एक व्हिडिओ केला. तो व्हिडिओ पाठवल्यानंतर पुन्हा एकदा त्याच्यात आणि बरखा यांच्यामध्ये वाद झाला. त्यानंतर संध्याकाळी भानू ठाकूर याने दोन पिस्तूल खरेदी केली
दुसऱ्या दिवशी सकाळीच त्याने प्रेयसी बरखा हिचे घर गाठले. घरी जाताच त्याने पहिल्यांदा बरखा हिच्यावर गोळी झाली. ती गोळी वर्मी लागल्याने तिचा मृत्यू झाला. तिच्या मदतीला धावलेल्या मामा बंटी याच्यावर देखील त्याने गोळी चालवली. गोळीबाराचा आवाज ऐकून शेजारी जाणारा लकी पाल हा युवक बाहेर आला. त्याला पाहताच भानू ठाकूर याने त्याचाही जीव घेतला.
दरम्यान पोलिसांना यापूर्वीच बरखा हिने भानू ठाकूर हा छेडछाड करत असल्याची तक्रार केली होती. यामध्ये भानू ठाकूर याला अटक देखील झाली होती. त्या नंतरच दोघांमधील वाद आणखी चिघळला होता. या घटनेचा पुढील तपास बैतूल पोलिस करत आहेत.











