शीतल थोरात : महान्यूज लाईव्ह
भारतीय नौदलात भरती होण्याचं तरुणांचं स्वप्न साकार होणार आहे.भारतीय नौदलामध्ये भरती होण्याची सुवर्ण संधी आली आहे. इंडियन नेव्हीने नाविक एमआर पदांवर भरतीचे आयोजन केले असून, यासाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार यासाठी ऑनलाईन अर्ज भरणे सुरू झाले आहे.
या भरतीच्या माध्यमातून नौदलामध्ये सेलर मॅट्रिक (10वी) क्लास रिक्रुटमेंट शेफ, स्टिवॉर्ड आणि हायजिनिस्टच्या पदांसाठी एकून 350 जागा भरणार असून, योग्य पुरुष उमेदवार अधिकृत वेबसाईट joinindiannavy.gov.in वर जाऊन रिक्त पदांसाठी अर्ज करू शकणार आहेत.
शैक्षणिक योग्यता व वयोमर्यादा
इच्छुक उमेदवार भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालाद्वारे मान्यता प्राप्त बोर्डाकडून 10 वी ची परीक्षा पास असणे बंधनकारक आहे. जन्म 1 एप्रिल 2001 ते 30 सप्टेंबर 2004 या वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
पगार
निवड झालेल्या उमेदवारांना ट्रेनिंग घ्यावे लागणार असून, या काळात त्यांना 14,600 रुपये स्टायपेंड दिला जाणार आहे. ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर, उमेदवारांना लेव्हल तीन नुसार 21,700 रुपये – 69,100 रुपये या स्केलने पगार दिला जाणार आहे. याव्यतिरिक्त, त्यांना डीए व्यतिरिक्त 5200 रुपये दर महिना एमएसपी दिला जाणार आहे.
शारिरीक योग्यता
उंची : 157 सेमी
रनिंग: 1.6 किमी 07 मिनिटे
बैठका : 20
छाती : कमीतकमी 5 सेमी फुगवून.
दरम्यान, इंडियन नेव्ही भरती 2021 ही इच्छुक आणि योग्य उमेदवार यासाठी ऑनलाईन अर्ज 19 जुलैपासून 23 जुलै 2021 या तारखेपर्यंत भरू शकणार आहे. इच्छूक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरण्यात यावे.











