माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर– महाराष्ट्र पोलीस दलातील पोलिसांची सेवा ज्येष्ठतानुसार नुकतीच पदोन्नती जाहीर करण्यात आली असून राजगड पोलिस ठाण्यातील कार्यरत असलेले नऊ पोलिस कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाली आहे. पदोन्नतीच्या प्रतिक्षेत असलेल्या पोलीस कर्मचार्यांना कोरोना काळात पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडुन सुखद धक्का मिळाला आहे.
राजगड पोलिस स्टेशन नसरापूर ( ता. भोर ) येथे कार्यरत असलेले हवालदार प्रमोद भोसले आणि सतीश चव्हाण यांची सहायक उपनिरीक्षकपदी बढती मिळाली आहे. तसेच पोलीस नाईक पदावरुन भगीरथ घुले आणि प्रतिमा भांड यांची पोलिस हवालदारपदी तर पोलीस कॉन्स्टेबल पदावरुन गणेश लडकत, नाना मदने, युवराज धोंडे, शिवलिंग कारंडे व मयुर निंबाळकर यांची पोलीस नाईकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. येथील सहाय्यक फौजदार आणि पोलीस हवालदारपदी म्हणून प्रत्येकी दोन जणांना व पोलीस नाईकपदी ५ जणांना पदोन्नती देण्यात आली
गेल्या काही दिवसांपासून पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकाळानुसार पात्र पोलीस नाईक, पोलीस कॉन्स्टेबल तसेच पोलीस हवालदार या पोलिस कर्मचार्याची पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्यात आली. डॉ. देशमुख यांनी नुकतेच याबाबतचे आदेश पारित केले आहे. अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील, पोलिस निरीक्षक संदीप घोरपडे यांनी पदोन्नती मिळालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.











