दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड शहरातील ७० वर्षीय कोरोना संसर्ग असलेल्या रुग्णाचा सोमवारी (ता. २५ ) मृत्यू झाला. या घटनेने दौंडकरांना धक्का बसला आहे.उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी ही माहिती दिली.
दौंड शहरात चहाचा व्यवसाय करणारा पहिला कोरोना बाधीत रूग्ण १६ मे ला आढळला होता. त्या नंतर त्या व्यक्तीच्या पत्नी व नातवाचा अहवाल कोरोना पाँझीटिव्ह आला होता. त्यानंतर काही दिवसांनी शहरातील गोवा गल्लीतील ७० वर्षीय व्यक्तिला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते,त्या ७० वर्षीय वक्तीचा सोमवारी मृत्यु झाला.
दौंड शहरातील कोरोनाने घेतलेला हा पहिला बळी ठरला आहे. दुसरीकडे कोरोना बाधीत मृत व्यक्तीच्या कुटुंबातील इतरांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आजमितीस शहरातील तीन कोरोना बाधीतांवर उपचार चालू आहेत अशी माहिती डॉ. डांगे यांनी दिली.











