दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांच्या मुलभूत विकासकामांसाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडुन रुपये 10 कोटी मंजुर झाली असल्याची माहीती आमदार मकरंद पाटील यांनी दिली.
वाई-खंडाळा-महाबळेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध गावांच्या प्रलंबित मुलभूत समस्या दूर व्हाव्यात यासाठी लोकांची सततची मागणी होत होती. यासाठी आमदार पाटील यांनी शासन स्तरावर वारंवार पाठपुरावा करुन या कामांसाठी निधी उपलब्ध करुन घेतला आहे. यामध्ये गावांतील अंतर्गत रस्ते वाडीवस्तीवरील रस्ते सुधारणा करणे, बंदिस्त गटर बांधणी, संरक्षक भिंती, सभामंडप बांधणे, स्म्शानभुमी सुशोभीकरण आदी कामांचा समावेश आहे.
यासाठी 10 कोटी मंजुर झाले आहेत. ही विकासकामे मार्गी लागून जनतेचे दैनंदिन जीवन सुखकर होणेसाठी मदत होणार असून ही कामे लवकरात लवकर सुरु करणेसाठी आमदार पाटील यांनी संबंधीतांना सुचना दिलेल्या आहेत.
मंजुर कामे पुढीलप्रमाणे (रक्कम लाखात) :
वाई तालुका : काळेवाडी (वासोळे) येथील ज्ञानेश्वर मंदिर ते माळावरचीवस्ती रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. (5.0), बोरीव येथील वाई जोर रस्ता ते बोरीव रस्ता खडीकरण व डांबरीकरण व गटर्स बांधकाम करणे.(10.00) अनपटवाडी अंतर्गत रस्ते डांबरीकरण व गटर्स बांधकाम करणे. (10.00), भुईज येथील बदेवाडी अंतर्गत रस्ते खडीकरण डांबरीकरण (10.00), कमळगड येथे सभामंडप बांधणे. (8.00), आसगांव येथे सभामंडप बांधणे. (10.00), व्याहळी कॉलनी येथील भैरवनाथ मंदिर ते काळुबाई मंदिर रस्ता खडी, डांबरीकरण करणे. (6.00),
नागेवाडी राजपुरेवाडा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. (8.00), वाशिवली शिवेचीवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे. (10.00), दसवडी येथील आरेवाडी ते माळवाडी रस्ता सुधारणा करणे. (5.00) मापरवाडी फाटा ते मारुती मंदिर खडीकरण व डांबरीकरण करणे.(8.00), गडगेवाडी मांढरदेव येथील मंदिरापाठीमागे संरक्षक भिंत बांधणे. (8.00) चिंधवली अंतर्गत रस्ता डांबरीकरण करणे. (10.00),
शेंदुरजणे खालची आळी येथे समाजमंदिर बांधणे. (8.00), बोपेगांव येथील बंदिस्त गटर्स बांधणे.(10.00), बोपेगांव येथील गाडीवाट रस्ता ते एन.एन-4 पर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. (15.00), नांदगणे फणसेवाडी संरक्षक भिंत व मोरी बांधणे (जोगलीचाओढा) सखाराम फणसे घराशेजारी (10.00), पांडे येथील मुस्लीम समाजाच्या दफनभूमीचे सुशोभिकरण करणे. (5.00),
बावधन येथे व्यासपीठ बांधणे.(5.00), शहाबाग येथील शशिकांत कोरडे घर ते आनंदराव हगीर मिळकतीपर्यंतचा रस्ता सुधारणा करणे. (10.00), जरीमंदिरते लालबाग पाणंद रस्ता खडीकरण व डांबरीकरण (10.00), व्याजवाडी येथे किशोर पिसाळ घरापर्यंतचा रस्ता सुधारणा करणे.(10.00), गुळुंब येथील मंदिराकडे जाणारा रस्ता सुधारणा करणे. (15.00),
वेळे येथील अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करणे. (10.00), ओहळी घोलपवस्ती रस्ता डांबरीकरण करणे.(8.00), वासोळे मांढरेवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.(10.00) शहाबाग येथील चौडापाट येथे संरक्षक भिंत बांधणे.(10.00), बावधन ते बावधन ओढा पुल रस्ता सुधारणा करणे.(20.00),
कवठे वाघजाईवाडी येथे बंदिस्त गटर्स बांधणे. (10.00), कवठे येथील प्राथमिक शाळा ते शेरीवस्ती जाणारा रस्ता सुधारणा (10.00), शेंदुरजणे येथील काळुबाईमंदिर येथे संरक्षक भिंत बांधणे.(8.00), चिखली मांढरेवस्ती येथे जननीमाता मंदिरालगत संरक्षक भिंत (10.00), कळंभे येथील बाजारवाट कुडाळ शिव ते खर्शी शिव रस्ता सुधारणा (10.00), अनवडी जुने गावठाण ते वाघजाई मंदिर रस्ता सुधारणा करणे.(10.00), राऊतवाडी येथे पेव्हर ब्लॉक बसविणे.(5.00),
मालुसरेवाडी (व्याजवाडी ) अंतर्गत गणेश मंदिर ते कॅनॉल रस्ता सुधारण (10.00), बोपेगांव अंतर्गत रस्ता डांबरीकरण करणे. (25.00), वाशिवली येथील अण्णा पाटील यांच्या वस्तीकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. (10.00), वाडकरवाडी (चिखली) ते दसवडी रस्ता सुधारणा करणे. (15.00), मालतपूर चाहुरवस्ती येथे सभामंडप बांधणे.(8.00),
कवठे – पांढरी येथे (सुरेश वीर) बंदिस्त गटर्स बांधणे. (10.00), उडतरे येथील अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे. (10.00), गुळुंब कोचळेवाडी वाघेश्वरी मंदिराकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण व मो-या बांधणे. (20.00), बावधन येथील नवीन गावठाण रस्ता सुधारणा करणे.(10.00), मेणवली येथील काळुबाई आळी रस्ता खडीकरण व डांबरीकरण (12.00) व्याजवाडी येथील सतीश पिसाळ घर ते खडकी धरण रस्ता सुधारणा करणे.(15.00),
बावधन येथील चर्मकार समाजासाठी समाजमंदिर बांधणे. (10.00) वेलंग येथील भैरवनाथवाडी पानवठाकडे जाणारा रस्ता सुधारणा करणे.(8.00), पसरणी मालकमपेठ येथील पोपट महागंडे घर ते नदीपर्यंतचा रस्ता सुधारणा करणे. (10.00), पाचवड खडकी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. (10.00), खोलवडी ते मालगांव रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. (15.00).
खंडाळा तालुका : अंदोरी अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण करणे. (10.00), धावडवाडी येथील मुस्लीम समाजासाठी पेव्हर ब्लॉक बसविणे. (5.00), शेडगेवाडी पोहच रस्ता सुधारणा करणे. (15.00), पारगांव येथील कदम निवास ते दत्ता पवार घरापर्यंत खडीकरण व डांबरीकरण व गटर्स बांधकाम करणे. (8.00), येळेवाडी (बोरी) येथे सभामंडप बांधणे. (10.00), कर्नवडी ऍ़प्रोच रस्ता सुधारणा करणे (10.00),
भादे येथील हणमंतराव साळुंखे वस्तीकडे जाणारा रस्ता खडीकरण (8.00), हरळी गावातील बंदिस्त गटर्स करणे. (10.00), झगलवाडी येथील बंदिस्त गटर्स बांधकाम करणे. (8.00), शिरवळ येथील गट नं.21 मधील कब्रस्थान येथे संरक्षक भिंत (10.00), मिरजे (काळुबाई मंदिर) सभामंडप बांधणे. (5.00), लोहम सभामंडप बांधणे. (10.00),
वाण्याचीवाडी अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे. (10.00), पाडेगांव येथील परचांडे वस्तीमधील रस्ता सुधारणा करणे. (10.00), भाटगर येथील जानुबाई मंदिर ते ग्रामपंचायत कार्यालय रस्ता कॉक्रीटीकरण करणे. (10.00), शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र ते इदगा मैदान रोड कॉक्रीटीकरण करणे. (10.00),
शिरवळ येथील शिवाजीनगर कॉलनी अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण (15.00), शिंदेवाडी येथील ग्रामपंचायत ते हिम्मत सोनावणे रस्ता कॉक्रीटीकरण करणे. (10.00), पारगांव येथील शहीद सुनिल यादव स्मारक ते बावडा रस्ता सुधारणा करणे.(10.00), निंबोडी लोणंद रस्ता ते गटवस्ती रस्ता खडीकरण डांबरीकरण(15.00), खेड बु. येथील गावठाण ते मानेवस्ती रस्ता सुधारणा करणे. (20.00), तोंडल येथील मानसिंग सर्जेराव जाधव ते कुंडलिक सोपान क्षीरसट रस्ता कॉक्रीटीकरण करणे. (10.00), मिरजे येथील करीमभाई घर ते जननीदेवी मंदिराकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (5.00), गोळेगांव अंतर्गत रस्ता डांबरीकरण करणे. (8.00), दापकेघर अंतर्गत रस्ता सुधारणा करणे.( 10.00), मोर्वे येथील मोकाशीवस्ती येथे अंतर्गतरस्ता डांबरीकरण करणे. (10.00), शिरवळ येथील ईश्वरनगरीमधील चौधरी यांच्या घरापासून आयुब शेख यांच्या घरापर्यंतचा रस्ता कॉक्रीटीकरण करणे. (10.00), शिरवळ येथील पळशी रोड ते केदारेश्वर तारागंण रस्ता कॉक्रीटीकरण करणे. (10.00), बावकलवाडी येथील जाधववस्ती येथे सभामंडप बांधणे. (10.00).
महाबळेश्वर तालुका : मेटगुताड येथे सामाजिक सभागृह बांधणे. (15.00), अवकाळी येथील अंतर्गत रस्ता खडीकरण व डांबरीकरण (8.00), हरोशी येथे पांडुरंग उत्तेकर यांच्या वस्तीकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.(10.00), माचुतरवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा करणे. (8.00), भेकवलीवाडी अंतर्गत रस्ते सुधारणा करणे.(8.00),
नाकिंदा येथील अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे.(8.00), तायघाट येथे अंतर्गत रस्ता सुधारणा करणे.(8.00), खिंगर येथील रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.(10.00), आचली येथील अंतर्गत रस्ते सुधारणा करणे. (10.00),
गुरेघर येथील अंतर्गत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.(5.00), झांजवड ते देवळीमुरा रस्ता सुधारणा करणे. (10.00), भोसे येथे अंतर्गत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. (10.00), आढाळ येथील रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. (10.00), सौंदरी वरचीवाडी येथे रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. (8.00), आकल्पे गाव अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण करणे. (5.00),
वारसोळी कोळी येथील इजिमा-29 ते वारसोळी रस्ता सुधारणा(10.00), राजपुरी अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण करणे.(12.00), दानवली ते भुतेश्वर रस्ता सुधारणा करणे. (10.00), दानवली येथील अंतर्गत रस्ता सुधारणा करणे. (5.00), कासवंड ते भिलार दानवली रस्ता सुधारणा करणे.(5.00), प्रजिमा-26 ते खांबील पोकळे सोनाट रस्ता सुधारणा करणे. (5.00).











