मुंबई : महान्यूज लाईव्ह
ईडीची पिडा मागे लागल्याने भाजपशी जुळवून घ्या असा लेटर बॉम्ब फोडून संपूर्ण राज्यात ज्यांनी सोशल मीडियात चर्चा घडवली, ते शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना आज उच्च न्यायालयाने दिलासा दिला. 28 जुलैपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करू नये अशा स्वरूपाचा आदेश उच्च न्यायालयाने दिल्याने त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
नोव्हेंबर २०२० मध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने प्रताप सरनाईक यांच्यासह दहा ठिकाणी छापे टाकले होते. सरनाईक यांच्या कुटुंबाशी संबंधित व्यवसाय आणि व्यवहारांची यानुसार चौकशी करण्यात आली होती. या कारवाई विरोधात सरनाईक यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार न्यायालयाने हे आदेश दिले.
दरम्यान सरनाईक यांनी आज विधानसभेतही हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, “माझ्यावर होणारे आरोप हे राज्य सरकार वरील आरोप आहेत. माझ्यामुळे राज्य सरकार विनाकारण बदनाम होत आहे. घोटाळ्याचा तपास करण्याची जबाबदारी गृहविभागाची आहे. मी गुन्हा केलाच नसेल तर मला ईडीच्या तपासानंतर राज्याच्या गृहविभागाने क्लिनचिट दिली पाहिजे.