पुणे : महान्यूज लाईव्ह
सोशल मीडियावर तरुणींचे फेसबुक शोधायचे.. फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायची.. एक्सेप्ट झाली की चॅटींग करायचे..ओळख वाढवायची लग्नाचे आमिष दाखवायचे आणि गंडा घालायचा..! औरंगाबादचा एक जणच एवढी सारी कामे करायचा. औरंगाबादच्या या लखोबा लोखंडे ने तब्बल 57 जणींना फसवले. अखेर बिबवेवाडी पोलिसांपुढे त्याची पोलखोल झाली.
योगेश दत्तू गायकवाड (रा. कन्नड, जि. औरंगाबाद ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी आळंदी देवाची येथे राहणा-या एका तरुणीने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बिबवेवाडीतील या तरुणीच्या बाबतीत हा प्रकार घडला आईच्या उपचारासाठी जानेवारी 2020 मध्ये बिबवेवाडीतील एका रुग्णालयात ही तरुणी आली होती त्यावेळी बसस्थानकावर वाट पाहत असताना योगेश गायकवाड चे आधार कार्ड या तरुणीला सापडले तरुणीने योगेश गायकवाड आधार कार्ड दिले त्यानंतर त्याने तिच्याशी व तिच्या सोबत ओळख वाढवली लष्करात असल्याचे खोटे ओळख पत्र दाखवत त्याने या कुटुंबाशी सलगी वाढवली. एवढेच नाही या तरुणीसोबत त्याने खोटे लग्नही केले व तिच्या भावाला लष्करात भरती करण्यासाठी दोन लाख रुपये त्या कुटुंबाकडून घेतले.
तर काही दिवसानंतर या तरुणीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तेव्हा तिने अधिक माहिती घेतली असता, असाच प्रकार त्याने तब्बल 53 जणींच्या बाबतीत केला असल्याचे उघड झाले. यानंतर पोलिसांकडे तिने धाव घेतली. पोलिसांनी केलेल्या तपासात देखील हा प्रकार उघडकीस आला.
पोलिसांनी त्याला सापळा रचून अटक केली. पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे, पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर, एपीआय राजेश उसगावकर, अमित पुजारी, सतीश मोरे, तानाजी सागर, श्रीकांत कुलकर्णी, अतुल महांगडे, अमोल शितोळे, दीपक लोधा, राहूल कोठावळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.