पुणे : महान्यूज लाईव्ह
आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबेग येथील हिरामण रामदास डोके या शेतकऱ्याचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. वीज पंप सुरू करण्यासाठी डोके हे पत्नीसह शेतात गेले होते.
शेतातील विहिरीवरील वीजपंप सुरू करण्यासाठी ते विहीरीकडे गेले असता, अचानक पाय घसरला व मोटार व्यवस्थित राहावी म्हणून तयार केलेल्या लोखंडी चार खांबा पैकी एका खांबावर हिरामण डोके यांचे डोके आपटल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांची शुद्ध हरपली आणि ते विहिरीत बुडत असताना पत्नीने पाहिले आणि पत्नीने मदतीसाठी आरडाओरडा केला.
तेव्हा त्या परिसरात असलेले श्रीराम डोके, मारुती डोके, बाळशिराम डोके, सुरेश तारू हे धावून आले. सुरेश तारू यांनी पाण्यात उडी मारून हिरामण डोके यांना बाहेर काढले व त्यांना तातडीने मंचर येथील दवाखान्यात उपचारासाठी नेले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.