मुंबई : महान्यूज लाईव्ह
मुंबई-आग्रा महामार्गावरून मुंबईच्या दिशेने जाणारा गॅस टँकर डिव्हायडर तोडून अचानक रेल्वे ट्रॅक वर गेल्यामुळे मध्य रेल्वे आज विस्कळीत झाली. संध्याकाळी 7 वाजून 21 मिनिटांनी ही घटना मुंबई-आग्रा महामार्गावर अटगाव गावानजीक घडली.
नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे फार मोठी हानी टळली असून सुदैवाने या घटनेत देखील कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र हा टँकर गॅस भरलेला असल्यामुळे हा नेमका या ठिकाणी कसा गेला? याची सध्या चर्चा सुरू आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचा हा गॅस टँकर होता. रेल्वे खात्याकडून यासंदर्भात चौकशी सुरू आहे. एम एच 46 बीबी 97 68 या क्रमांकाचा हा टँकर अचानक रेल्वे रूळ ओलांडून बरोबर रेल्वेच्या रुळाच्या मध्यभागी अडकला.
सुदैवाने नेमक्या याच वेळेस मध्य रेल्वेची कोणतीही रेल्वे या ठिकाणावरून गेली नाही, अन्यथा फार मोठ्या दुर्घटनेला आज सामोरे जावे लागले असते. रेल्वे कर्मचार्यांच्या प्रसंगावधानामुळे पुढील प्रसंग त्याला व मध्य रेल्वे सेवा विस्कळीत झाली.