मुंबई : महान्यूज लाईव्ह
राज्यातील मुलांच्या मनातील नैराश्य दूर करण्यासाठी सभगृहाचे कामकाज संपताच वैद्यकीय शिक्षण, पोलिस, आरोग्य खात्यातील सर्व घश्रेणीतील ज्याप्रमाणे भरती सुरू आहे, एमपीएससीने लवकरात लवकर निर्णय घेतले पाहिजेत, यासाठी संध्याकाळीच बैठक घेणार आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
राज्य सरकार यामध्ये सकारात्मक आहे. राज्यातील सर्व तरुण तरुणींना सांगायचे आहे की, राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे आग्रही आहेत. मात्र सर्वौच्च न्यायालयाचे काही निर्देश आहेत. एमपीएससी ही स्वायत्त संस्था आहे. त्यामुळे त्यांच्या मर्यादेत सरकारला फार हस्तक्षेप करता येत नाही. मात्र सध्याची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे त्यातूनही मार्ग काढण्याची भूमिका सरकारची आहे. मुनगुंटीवार यांनी स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबियांंना मदतीची भूमिका मांडली आहे, त्याबाबतही सरकार सकारात्मक भूमिका घेईल.
ही घटना सरकार कोणाचेही असो, त्यांच्या कोणाच्याही काळात ही घटना घडू नये. सर्वांनाच या घटनेचे दुःख झाले आहे. लोणकर कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सारे सहभागी आहोत. अशी वेळ कोणाच्याही बाबतीत येणार नाही याची खबरदारी सरकार घेईल असे उपमुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले.