ऋतुजा थोरात : महान्यूज लाईव्ह
सैराट चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा तानाची सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. शिरीरसाथ देत नसलं तरीही स्वत:चा आत्मविश्वास डगमगू न देता सकारात्मक भूमिकेतून विचार करायला लावणारा तानाजीने न्यूड फोटोशूट करुन चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच दिला आहे.
मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरू सोबतच घराघरात पोहोचलेला तानाजी गळगुंडे हा एक सर्वसामान्य मुलाने सैराट चित्रपटत दमदार कामगिरी बजावली. तानाजीच्या शिरीराचे भाग जरी वेडेवाकडे असले तरी या फोटो शुटमुळे सर्व चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
तानाची म्हणतो , “माझे पाय तर योग्य नाहीयेत, पण माझं संगीत उत्तम आहे…! मी माझ्या स्वतःच्या जीवावर काम करतो, मी एक चांगला माणूस आहे…कारण मी मी आहे.!” असे कॅप्शन देऊन त्याने फोटो अपलोड केले आहेत. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहेत.