नगर : महान्यूज लाईव्ह
अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील चितळी येथील सुजित चौधरी या तरुणाने पोलीस शिपायाचे नाव लिहून हा पोलिस त्याच्या माणसा करावी मला त्रास देत असल्याचे सांगत आत्महत्या केली.
पंचवीस वर्षीय सुजित चौधरी याने घराजवळच्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. मात्र सोशल मीडियावर पोलिस कर्मचाऱ्यांनी आपला छळ केल्याचे लिहिल्याने राहाता तालुक्यातील पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे.
या पोलिस कर्मचाऱ्याच्या छळामुळे आपण आत्महत्या करत असल्याचा संदेश त्याने इंस्टाग्राम वर दिला होता. शंकर संपत चौधरी नावाचा हा माणूस माझा छळ करत आहे, त्यामुळे मी आत्महत्या करीत असल्याचे त्याने लिहिले आहे.