पुणे : महान्यूज लाईव्ह
महाराष्ट्रात अंधश्रद्धा विरोधी कायदा लागू करून आता काही वर्षे उलटली, पण तरीदेखील सामान्यांपासून अगदी गर्भश्रीमंतांपर्यंत ढोंगी बाबाचा संबंध काही केल्या संपत नाही.. पुण्यात काल उद्योजक आनंद गुजर यांचा मृतदेह कात्रजच्या घाटात आढळला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली, पण बहाद्दर पोलिसांनी अवघ्या बारा तासात आरोपी शोधून काढले. हे आरोपी दुसरे-तिसरे कोणी नव्हते, ती होती, आनंद गुजर यांची पत्नी!
नवर्याच्या हातात बायकोच मुख्य सूत्रधार ठरली आणि पोलिसांनी बुवाबाजी सकट सारकाही उखडून टाकले. ढोंगी बाबा बरोबर असलेल्या अनैतिक संबंधास आपला नवरा अडसर ठरत असल्याने ढोंगी बाबा असलेला प्रियकर आणि त्याच्या सहकाऱ्याच्या मदतीने नवऱ्याचा काटा काढला आणि हा त्यानंतर त्याचा मृतदेह कात्रजच्या घाटात टाकून दिला.
चिखली येथील आनंद गुजर यांच्या हत्येचा उलगडा भारती विद्यापीठ पोलिसांनी बारा तासाच्या आत केला. याप्रकरणी आनंद यांचा भाऊ सुनिल गुलाब गुजर (36) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
दरम्यान आनंद गुजर यांच्या हत्येप्रकरणी आनंद यांची पत्नी सरोज (वय- ४०) हिच्यासह, तिचा प्रियकर व भोंदुबाबा रमेश विलास कुंभार (49, रा, आकुर्डी, पुणे) व त्याचे दोन सहकारी यश योगेश निकम (19, रा. वाल्हेकरवाडी, निगडी) व अमोल रामदास बडदम (रा. वाल्हेकरवाडी, निगडी) अशा चौंघाना अटक केली आहे.
भारती विद्यापीठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज घाटातील नवीन बोगद्याजवळील मृतदेह हा आनंद गुजर यांचा असल्याचे समोर आल्यावर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. तपासादरम्यान फिर्यादी असलेले आनंद यांचे भाऊ सुनील यांनी पोलिसांना माहिती दिली की आनंद यांची पत्नी सरोज आणि परिसरात बुवाबाजी करणारा रमेश कुंभार यांच्यात अनैतिक संबंध होते या अनैतिक संबंधाचा संशय भाऊ आनंद याला देखील आला होता त्यातूनच सरोज आणि आनंद यांच्यात मालमत्तेवरून वाद सुरू होतात ही माहिती सुनील यांनी देताच पोलिसांनी आपला मोहरा सरोजी त्यांच्याकडे वळवला आणि पोलिसी खाक्या दाखवताच सरोज पोपटासारखी बोलू लागली. सरोज व रमेश कुभांर या दोघांनीही आपल्या दोन साथीदाराच्या मदतीने आनंद गुजर यांचा खून केल्याची कबुली दिली.
वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलिस निरीक्षक संगिता यादव, पोलिस निरीक्षक प्रकाश पासलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीन शिंदे, अंमलदार रवींद्र भोसले, रवींद्र चिप्पा, सचिन पवार, हर्षल शिंदे, गणेश शेंडे, विक्रम सावंत, आशिष गायकवाड, सचिन गाडे, जगदीश खेडकर, प्रसाद टापरे आणि संतोष खताळ यांच्या पथकाने केली आहे.