विशाल कदम : महान्यूज लाईव्ह
पुणे : राज्य लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊनही गेल्या दोन वर्षापासून बेरोजगार असलेल्या एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार फुरसुंगी (ता. हवेली) हद्दीतील गंगानगर परिसरात बुधवारी (ता. २९ जून) उघडकीस आला आहे.
स्वप्निल सुनील लोणकर (वय २४, गंगानगर, फुरसुंगी ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्निलचे वडील सुनील लोणकर यांचा शनिवार पेठेत छपाईचा व्यवसाय आहे. नेहमीप्रमाणे त्याचे आई -वडील बुधवारी (२९ जून) कामावर गेले होते.
स्वप्नील हा घरी एकटाच होता. त्याची बहिण दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घरी आली. तेव्हा स्वप्निल तिला दिसला नाही. तीने स्वप्नीलच्या खोलीत जाऊन पहिले असता, स्वप्निनले गळफास घेतलेले आढळून आले. स्वप्नीलच्या बहिनेने याबाबत आई वडिलांना माहिती कळविली. आणि स्वप्निलला घेऊन तातडीने एका खाजगी रुग्णालयात घेऊन गेली. मात्र, डॉक्टरांनी उपचारापुर्वीच त्याचा मृत झाला असल्याचे घोषित केले.
दरम्यान, स्वप्नीलनी स्थापत्य अभियांत्रिकेचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षांची तयार करीत होता. राज्य लोकसेवा आयोगाची २०१९ मधील मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखत झाली नव्हती. तसेच २०२० मधील पूर्व परीक्षाही तो उत्तीर्ण झाला होता. मात्र, मुख्य परीक्षा होत नव्हती. नोकरीच्या विवंचनेतून त्याने आत्महत्येचा पर्याय स्वीकारला आहे. असे स्वप्नीलने आत्महत्या करण्यापूर्वी सूसाईड नोटमध्ये लिहिले आहे.
स्वप्नीलची आत्महत्या करण्यापूर्वीची सुसाईड नोट अशी..
येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत फक्त वय आणि ओझं वाढत जात आहे. दोन वर्ष झाले आहेत पास आऊट होऊन; आणि 24 वर्ष वय संपत आलंय. घरची एकंदरीत परिस्थिती, परीक्षा निघणाऱ्या आशेवर घेतलेलं कर्ज, खाजगी नोकरी करून कधीही फिटू न शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या आणि इतर सर्वांच्या वाढत्या अपेक्षा आणि माझी, मी प्रत्येक वेळी व प्रत्येक ठिकाणी कमी पडतोय ही भावना..!
कोरोना नसता, सर्व परीक्षा सुरळीत झाल्या असत्या तर आज आयुष्य खूप वेगळं आणि चांगलं असतं हवं ते हवं तसं प्रत्येक साध्य झाला असतं. मी घाबरलो, खचलो असं मुळीच नाहीये.. मी कमी पडलो.. माझ्याकडे वेळ नव्हता.. नकरात्मकतेची ही वादळं कित्येक दिवस मनात होती. पण काहीतरी चांगलं होईल, या आशेवर तर धरला होता.. पण.. इथून पुढे आता आयुष्य कंटिन्यू होऊ शकेल असं काहीच उरलं नाहीये. कोणतीही व्यक्ती याला कारणीभूत नसून, हा माझा सर्वस्वी निर्णय आहे.. मला माफ करा शंभर जीव वाचवायचे होते मला डोनेशन करून 72 राहिले… स्वप्निल लोणकर