विशाल कदम : महान्यूज लाईव्ह
पुणे : जमिनीचा ताबा व फसवणूक केल्या प्रकरणी पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक गणेश उर्फ केदार नानासाहेब गायकवाड व त्यांच्या साथीदारांवर चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनाली दीपक गवारे, दीपक गवारे, गणेश नाना गायकवाड, विलास थानमल पालरेषा, चिमनलाल मिठालाल ओसवाल यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी प्रितम खांदवे (वय-३९) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रितम खांदवे हे लोहगाव परिसरात जागा खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. वरील आरोपींनी खांदवे यांच्याकडून एक प्लॉट खरेदी केला होता. आरोपींनी संगनमत करून बनावट खरेदीखत करून चुकीच्या चतु:सिमा टाकल्या आणि खांडवे यांची फसवणूक केली.
तसेच सर्व आरोपींनी जबरदस्ती व दमदाटी करत सर्व्हे नंबर १३४/३/१ मधील जमिनीतून सोनाली गवारी व दीपक गवारी यांना त्यांच्या जागेत जाता येता यावे यासाठी खांदवे यांची जागा बळकावण्यासाठी बेकायदेशीररित्या ताबा घेतला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास चंदननगर पोलीस करीत आहेत.