पुणे : महान्यूज लाईव्ह
विवाह नोंदणी संकेतस्थळाच्या माध्यमातून नाशिकच्या तरुणाने पुण्यातील तरुणीशी लग्नाची विनंती केली. लग्नाची विनंती आल्यानंतर पुढील बोलणीच्या निमित्ताने हा पुण्यात आला…आणि बोलण्याच्या निमित्ताने भेटण्याचे कारण देत त्याने तरुणीवर जबरदस्तीने बलात्कार केला.
केतन शेळके (रा. पोलीस हौसिंग सोसायटी, नाशिक) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून यासंदर्भात २८ वर्षीय पीडित तरुणीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मेट्रीमोनल संकेतस्थळावर पुण्यातील तरुणीने आपले नाव नोंदवले होते. तो बायोडाटा पाहून नाशिकच्या केतन शेळके याने लग्नाची विनंती पाठवली. त्यातून ओळख वाढवली.
केतन शेळके हा मुलगी पाहण्यासाठी तिच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी थेट पुण्यात आला. तिच्याशी एकटीशीच बोलायचे आहे असे सांगून या तरुणीला केतन याने विद्यापीठाच्या आवारात बोलावले. तरुणी सदर ठिकाणी गेल्यानंतर गप्पा मारत त्याने तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी कली. तरुणीने नकार दिल्यानंतर आरोपीने जबरदस्तीने तिला गाडीत बसूवून शिवाजीनगर परिसरातील एका लॉजवर घेऊन गेला. आणि तरुणीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.
त्यानंतर केतन याने पीडित तरुणीला नाशिक आणि इतर ठिकाणी बोलावून शारीरिक संबंध ठेवले. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२० या कालावधीत हा प्रकार घडल्यानंतर या तरुणीशी लग्न करण्यास केतन शेळके याने अचानक नकार दिला. यासंदर्भात विचारणा केली असता त्याने तरुणी व तिच्या आईला अर्वाच्च शिवीगाळ करीत धमकी दिली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने पोलिस ठाण्याची वाट धरली. पुढील तपास शिवाजीनगर पोलिस करीत आहेत.