• Contact us
  • About us
Thursday, September 3, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पुण्या-मुंबईच्या पाहुण्यांमुळं बारामती, इंदापूर, दौंडमध्ये कोरोनाचे अर्धशतक!

Maha News Live by Maha News Live
May 25, 2020
in शेती शिवार, मनोरंजन, राजकीय, राज्य, लाईव्ह, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
पुण्या-मुंबईच्या पाहुण्यांमुळं बारामती, इंदापूर, दौंडमध्ये कोरोनाचे अर्धशतक!

पाहुण्यांचं आगमन गावकऱ्यांसाठी बनतोय डोक्याला ताप..

राजेंद्र झेंडे, दौंड : महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
इंदापूर, बारामती व दौंड तालुक्याने ६० दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये कोरोनाला शिस्तबध्दरित्या रोखले खरे, पण पुण्या-मुंबईने कोरोनाला बारामती, इंदापूर व दौंडमध्ये बरोबर पोहचवले..केवळ पुण्या-मुंबईनेच या तीन तालुक्यात तब्बल ५२ कोरोनाग्रस्त दिले. आज बारामती तालुक्यातील लोणीभापकर येथील कोरोनाग्रस्तामुळे ही संख्या ५२ वर पोचली.

मागील पंधरवड्यात दौंड, इंदापूर व बारामती तालुक्यात पुण्या-मुंबईतून सव्वा तीन हजार पाहुणे आले. दौंडमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले असले तरी ते राज्य राखीव पोलिस दलाचे बहुतांश जवान आहेत. मात्र त्यातही महत्वाची बाब म्हणजे या शूर जवानांना पुण्या-मुंबईतील बंदोबस्तामुळेच कोरोनाची लागण झाली हे नक्की..! त्यामुळेच पुण्या-मुंबईनेच या तीन तालुक्यांना कोरोनाची लागण भेट दिली. दौंड तालुक्यात सर्वाधिक ४१ जणांना झालेली कोरोनाची बाधा ही पुण्या- मुंबईतील संक्रमणामुळेच झाली. बारामती तालुक्यात मुंबई-पुण्यातून आलेल्या ७ जणांना कोरोनाची लागण झाली. तर इंदापूर तालुक्यात मुंबईतून आलेल्या चार जणांना कोरोनाची लागण झाली. थोडक्यात नव्याने कोरोनाची लागण होत असलेले रुग्ण हे पुण्या- मुंबईतून आलेले असल्याने सध्या तिन्ही तालुक्यात पुण्या-मुंबईतून आलेला पाहुणा गावाच्या डोक्याला ताप बनला आहे.
दररोज शासनाची नजर चुकवून शहरातून शेकडो जण मिळेल त्या वाहनाने व दिसेल त्या रस्त्याने आपल्या गावापर्यंत येत आहेत, जिथे फार विरोध होईल, तिथे इन्स्टिट्यूट क्वारंटाईन होत आहेत, तर काही ठिकाणी खमक्या स्थानिक नातेवाईक असेल, तर बिनधास्त घरात राहून गावातही चकाट्या पिटत आहेत. मात्र याचा मनस्ताप गावकऱ्यांना होऊ लागला आहे. आतातर मुंबईहून येणारा बहुतेकदा कोरोनाच्या टप्प्यात जाऊन आलेलाच दिसू लागल्याने मुंबईकरावर मात्र गावकरी जरा जास्तच नजर ठेवून आहेत.
इंदापूरमध्ये शिरसोडी, पोंदकुलवाडी, पळसदेव, बारामतीमध्ये मुर्टी, माळेगाव, वडगाव निंबाळकर, लोणीभापकर, कटफळ तर दौंडमध्ये राज्य राखीव पोलिस दलाचा संपूर्ण गट या कोरोनाने व्यापण्यामागे पुणे- मुंबईकरांचे गावावरचे प्रेम कारणीभूत ठरले आहे.

Tags: covid19
Next Post
१५ जून पासून राज्यात शाळा सुरू होणार!

१५ जून पासून राज्यात शाळा सुरू होणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

July 13, 2026
पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

July 13, 2026
जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

July 13, 2026
शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

July 13, 2026
उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

पुणे जिल्ह्यातील बावडा, सणसरसह चार मंडळ महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन; बोगस व अनियमित नोंदी प्रकरणी महसूल विभागाची मोठी कारवाई

July 12, 2026
मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

July 12, 2026
आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

July 12, 2026
नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

July 11, 2026
बारामती तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींची रणधुमाळी; १२ जून रोजी सदस्य आरक्षण सोडत!

SIR आणि गुरुजी आडवे आले? १३ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर?  मतदार पुनरीक्षण (SIR) मुळे जानेवारीनंतरच बिगुल वाजण्याचे संकेत!

July 11, 2026
बारामतीतील सायबर गुन्हेगारीची चौथी घटना! आणखी दोघांची 68 लाखाची फसवणूक!

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला; सहा जणांसह इतरांविरुद्ध गुन्हा, कठोर कारवाईचा इशारा

July 10, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group