धक्कादायक! ‘काम शोध, मोबाईलवर गेम का खेळतो’ या कारणावरून 25 वर्षीय मुलाने केला वडिलांवर चाकूहल्ला
पुण्यात आई-वडील फक्त बहिणी वरच जास्त प्रेम करतात म्हणून द्वेषापोटी बहिणीवर जीवघेणा हल्ला
शीतल थोरात : महान्यूज लाईव्ह
आताची नवीन पिढी मोबाईलसाठी काहीही करायला तयार आहे. मोबाईलवर खेळण्यासाठी वडील रागवल्यामुळे मुलाने वडिलांवर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली. शुभम उर्फ गोलू निरगुडे (वय 25 वर्ष) असं आरोपी मुलाचे नाव असून, हा तरुण कामावर जायचं सोडून दिवसभर मोबाईलवर गेम आणि चित्रपट बघत बसायचा. त्याच्या भविष्याच्या चिंतेने वडील मुलावर रागवले. तर या मुलाने वडिलांवर चाकूने हल्ला केल्याची धक्कायक घटना घडली.
दीपक भाऊराव निरगुडे असं दुर्दैवी वडिलांचे ( वय 52 वर्ष) नाव असून, नागपुरातील इंदिरानगर जाटतरोडी क्रमांक 1मध्ये निरगुडे कुटुंब राहत आहे. 52 वर्षीय दीपक निरगुडे रिक्षा चालवण्याचा काम करत आहेत. वडील व मुलाचे काम शोधण्यावरून सतत भांडण व्हायची.
25 जुनला रात्री दीपक निरगुडे रिक्षा चालवून घरी आल्यानंतर मुलगा त्यांना मोबईलवर खेळताना दिसला. त्यामुळं त्यांनी मुलालं मोबईल खेळत असल्याबद्दल रागवून काम शोध असं बोलले. वडिलांनी रागवलं म्हणून शुभम संतापून टोकाचं पाऊल उचललं आणि घऱातील चाकू घेत वडिलांच्या पोटावर वार करत जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामुळे वडिल गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीन रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, याप्रकरणी इमामवाडा पोलिसांनी गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल करून आरोपी मुलाला अटक केली आहे. पोलिसांनी कारवाई केली असली तरी पोटच्या पोरानं मोबईलकरता आपला जीव घेण्याचा प्रयत्न केला हा आघात वडिलांसाठी फार मोठा आहे. मोबाईलसाठी वडिलांवर जीवघेणा हल्ला केल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
पुण्यात भावाचा बहिणीवर जीवघेणा हल्ला!
दुसरीकडे पुण्यातील सिंहगड रोड परिसरात अशीच एक दुर्दैवी घटना घडली असून आई-वडील फक्त बहिणीच जास्त बाजू घेतात बहिणी वर जास्त प्रेम करतात या देशातून भावाने बहिणीवर जीवघेणा हल्ला केला.
शंकर भीमराव हाटकर असे या आरोपीचे नाव असून, रोहन लक्ष्मण पारधे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी याच्यावर गुन्हा दाखल केला. शंकर हटकर हा रोहनचा मामा असून रोहनची आई मनीषा म्हणजे शंकरची बहिण ही सातत्याने आई-वडिलांना मदत करते. मात्र यातून आई-वडील फक्त तिलाच अधिक किंमत देतात त्यातून घरात आपली काहीच किंमत राहिली नाही म्हणून शंकर हटकर याला बहीण मनीषा विषयी राग होता
या रागातून त्याने मोठे पाऊल उचलले. गुरुवारी रात्री मनीषा यांच्या डोक्यात कुऱ्हाड मारून शंकर याने जीवघेणा हल्ला केला. यात मनीषा गंभीर जखमी झालेल्या असून, त्यांना उपचाराकरता तात्काळ खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास सिंहगड पोलिस करत आहेत.