इंदापूर : महान्यूज लाईव्ह
ग्रामपंचायतीच्या नळाचे पाणी तुम्ही का भरले,या नळाची पाणीपट्टी आम्ही ग्रामपंचायतीला भरत आहे, असे सांगत पाणी भरण्याच्या प्रश्नावरून महिला व तिच्या मुलास शिवीगाळ, दमदाटी व मारहाण केल्याप्रकरणी 14 जणांवर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी गावच्या हद्दीत घडली.
सारिका रघुनाथ गायकवाड वय 35 (रा. लाखेवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात आपल्याला व आपल्या मुलीला मारहाण झालेल्या बाबतची फिर्याद दिली आहे.
तर शिवीगाळ, मारहाण व दमदाटी केल्याप्रकरणी निखिल गोरख गायकवाड, नेहा गोरख गायकवाड, सिमा गोरख गायकवाड, गोरख तुकाराम गायकवाड (चौघे रा लाखेवाडी खराओढा ता इंदापुर जि पुणे ). लोचना प्रभाकर चव्हाण, संतोष प्रभाकर चव्हाण, निलेश प्रभाकर चव्हाण (रा बिजवडी ता. इंदापुर जि. पुणे) व त्याचे सोबत अनोळखी 7 इसम यांच्यावर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सदरची घटना बुधवारी 30 जून रोजी दुपारी 12.30 च्या सुमारास व सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास लाखेवाडी ता. इंदापुर जि. पुणे) गावचे ह्ददीत फिर्यादी यांचे घरासमोर घडली. सदर प्रकरणातील आरोपी निखिल गोरख गायकवाड, नेहा गोरख गायकवाड, सिमा गोरख गायकवाड, गोरख तुकाराम गायकवाड व फिर्यादी सारिका गायकवाड हे एकमेकांचे शेजारी शेजारी राहणेस आहेत.
बुधवारी (३० जून) रोजी दुपारी 12/30 वा.चे सुमारास यातील फिर्यादी व मुलगा अलंकृत हे त्यांचे घरासमोर असलेल्या ग्रामपंचायतीच्या नळाचे पाणी भरत असताना वरील आरोपींनी तेथे येवुन निखिल गायकवाड याने शुभेच्छुक सारिका गायकवाड यांना तुम्ही या नळाचे पाणी का भरले? अशी विचारणा केली. या नळाची पाणीपट्टी ग्रामपंचायतीकडे आम्ही भरतो आहे असे म्हणुन तिघांनीही सारिका तसेच त्यांचा मुलगा अलंकृत, मुलगी निलम यांना शिवीगाळ दमदाटी करुन हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
त्यानंतर सायंकाळी 6 च्या सुमारास यातील सर्व आरोपी यांनी बेकायदेशीर गर्दी जमाव जमवुन सारिका गायकवाड तसेच त्याचे पती मुलगा अलंकृत, मुलगी निलम यांना दुपारी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन शिवीगाळ दमदाटी करुन हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली. अशा आशयाची फिर्याद इंदापूर पोलिस ठाण्यात दिली आहे. पुढील तपास पोलिस शिपाई आटोळे हे करीत आहेत.