मुंबई : महान्यूज लाईव्ह
प्रत्येक गोष्ट कॉपी करावी असं नाही, मात्र मराठी मध्ये प्रत्येक गोष्ट कॉपी केली जाते असा जो आरोप केला जातो त्यामध्ये काही तथ्य दिसू लागलंय.. झी मराठी वरील बायजू प्रस्तुत लिटिल चॅम्प सा रे ग म प या रियालिटी शोमध्ये पंचरत्नांनी जी ओव्हर ॲक्टींग सुरू केली आहे त्यामुळे हे पंचरत्न नेटकऱ्यांचे ट्रोल बनले आहेत..
झी मराठी वाहिनीवर दिर्घ कालखंडानंतर सारेगमप लिटील चाम्प चे नवे पर्व सुरू झाले आहे. यामध्ये पहिल्या पर्वातील विजयी पंचरत्न म्हणजेच आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड, रोहित राऊत, प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन या पाच जणांना परीक्षक म्हणून घेण्यात आले आहे. पहिल्यांदाच एखाद्या स्टेज शोमध्ये सुरुवातीच्या स्पर्धकांना नंतरच्या पर्वात परीक्षक म्हणून घेण्यात आले आहे आणि त्यातच कॉपी करण्याची स्पर्धा दिसू लागल्याने वाहिनी वरील हा कार्यक्रम पाहणाऱ्यांनी त्यांची खिल्ली उडवण्यात सुरुवात केली आहे. हे जरा अतीच होते असे सांगत नेटकरी या सर्वावर तुटून पडले आहेत.
प्रत्येक गाण्यानंतर रोहितची रिएक्शन बघून एक मिम्स बनवल्या आहेत. यामध्ये चित्रपटातील वेगवेगळ्या प्रकारचे डायलॉग रोहित राऊतवर टाकण्यात आले आहेत. आर्या आंबेकर देखील यामध्ये ट्रोल बनली आहे. प्रत्येक गायकांना वरचा ‘सा’ देण्याच्या परीक्षकांच्या निर्णयाला देखील नेटकऱ्यांनी वेड्यात काढले आहे.
सायलेन्स मधला जो सा आहे तो तुला सापडला आहे अशी टीका देखील रोहित राऊत वर केली असून, मृण्मयी देशपांडे यांच्या बाबतीत परेश रावल चा फोटो ठेवून तू जा रे अशा प्रकारचे डायलॉग वापरण्यात आले आहेत. आर्या आंबेकरला देखील केतकी पंडित यांची कॉपी करते असं बजावत तिची खिल्ली उडवली आहे, तर प्रथमेश लघाटे महेश काळे ची कॉपी करतो अशा स्वरूपाच्या मीम्स तयार करण्यात आलेल्या आहेत. आर्या आंबेकर आणि कार्तिकी गायकवाड यांना नेहा कक्कर ची कॉपी करणाऱ्या म्हणून मीम्स तयार करण्यात आलेल्या आहेत.