शिरूर : महान्यूज लाईव्ह
आर्थिक उन्नती साठी पिकांच्या उत्पादन वाढीबरोबरच विक्री व्यवस्थासाठी फार्मर्स प्रोड्यूसर्स कंपनीच्या माध्यमातून अधिक उत्पन्नसाठी कृषि विभागाशी संपर्क शेतकऱ्यांनी वाढवावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी शिरीष भारती यांनी केले.
कृषि संजीवनी मोहीम सांगता व कृषिदिन कार्यक्रम निर्वी (ता.शिरूर) येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खरेदी विक्री संघाचे संचालक आबासाहेब सोनवणे होते, तर कार्यक्रमासाठी सरपंच जयश्री लटाबंळे, उपसरपंच निलेश सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य मनिषा पवार, सविता पवार, प्रियंका माळवदकर, तात्यासाहेब सोनवणे, मोहनराव सोनवणे, पोलीस पाटील राजेंद्र सोनवणे, अफार्म संस्थेचे शिंदे, सह शेतकरी उपस्थित होते.
कृषि सहायक जयवंत भगत यांनी प्रस्ताविक करताना स्व. वसंतराव नाईक जयंती निमित्ताने नाईक यांच्या जीवनपटाबद्दल बोलताना सांगितले कि, अन्नधान्य मध्ये राज्य स्वयंपूर्ण करण्यात वसंतराव नाईक यांचा मोठे योगदान असल्याचे नमुद केले. अविनाश निर्मल यांनी गट स्थापना, फार्मर कंपनी स्थापना व विविध योजना बाबत माहिती दिली.
अफार्म चे शिंदे यांनी फळबाग लागवड संगोपन बाबत सविस्तर माहिती दिली तसेच कंपनीच्या माध्यमातून 4 हजार वृक्षारोपण कार्यक्रम होणार असल्याचे सांगितले. उपसरपंच निलेश सोनवणे यांनी गावात फळबाग लागवड उपक्रम यशस्वी होण्यासाठी आवाहन करताना या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना आबासाहेब सोनवणे यांनी सांगितले कि, फार्मर कंपनी स्थापन करून शेतीमाल विक्री व्यवस्था अधिक सोईची होईल त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी प्रयत्न करावेत, तसेच पाण्याच्या बचतीसाठी सुक्ष्म सिंचन तसेच पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेला महत्त्व द्यावे असे सुचवले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य अनिल कांबळे तर आभार सरपंच जयश्री लटाबंळे यांनी मानले