दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : गेल्या दोन वर्षापासून कोरोना या विषाणुने थैमान घातलेला असून याचा सामना करण्यासाठी डॉक्टर्स,नर्स, पोलीस, आशाताई यांनी देवदुताची भूमिका पार पाडून वेळप्रसंगी आपला जीव धोक्यात घालून रुग्णांची, जनतेची सेवा केली. याच प्रेरणेतून वाई नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते सतिश वैराट यांनी आज वाई येथील ग्रामीण रुग्णालय, वरद हॉस्पिटल व स्पंदन हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांच्याबरोबर डॉक्टर्स डे साजरा केला.
आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. तसेच आपल्याला जनतेने त्यांची सेवा करण्याची संधी दिलेली आहे. त्यामुळे आपण त्या संधीचं सोनं करणं हे आपल आद्य कर्तव्य आहे याची जाण ठेवून नगरसेवक सतिश वैराट यांनी ही कृतज्ञता व्यक्त केली.
त्यांनी आज डॉक्टर्स डे च्या निमित्ताने ग्रामीण व खाजगी रूग्णालयात जाऊन डॉक्टर्स, नर्सेस यांना शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी ग्रामीण रूग्णालयातील डॉ. सुजाता बचुटे, परिचारिका छाया गाढवे, उज्ज्वला पवार, स्वाती डेरे, स्पंदन हॉस्पिटलमधील डॉ. महेश मेणबुदले व त्याचा स्टाफ, तर वरद हॉस्पिटलमधील डॉ. शैलेंद्र धेडे, शिवसेना पदाधिकारी गणेश जाधव, सोमनाथ अवसरे, नितीन पानसे, दत्तात्रय गायकवाड आदी उपस्थित होते.