ऋतुजा थोरात : महान्यूज लाईव्ह
दुचाकी आणि स्वीफ्ट गाडीचा भीषण अपघात झाल्याने दुचाकीस्वारासह चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना आज दुपारी चाळीसगाव तालुक्यातील रोहिणी गावाजवळ घडली. मृतांमध्ये एका गर्भवती महिलेसह दोन पुरुष व एक अल्पवयीन बालकाचा समावेश आहे.
चाळीसगाव येथून नांदगावच्या दिशेने दूचाकीवर हे चौघे जात होते. दरम्यान, रोहिणी गावाजवळील नक्षत्र हाॅटेलसमोर वेगाने स्वीफ्ट कारने दुचाकीला जोरदार धडक दिली अशी माहिती सुत्रांनी दिली.
या अपघाताची माहिती मिळताच परिसरातून स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मारुती कंपनीची स्विफ्ट डिझायर क्रमांक एम एच 0 2 डी.जे या गाडीने समोरून येणाऱ्या दुचाकी (क्रमांक एम एच 0 2 डीजे 6476) या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीचा पूर्ण चेंदामेंदा झाला, तर दुचाकीवरून निघालेले सालदार विलास मोरे, भगवान नागराज पाटील, कल्पना मोरे आणि तीन वर्षाची मुलगी रेणुका यांचा जागीच मृत्यू झाला. दोन वर्षाचा अमोल मोरे या अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याला धुळे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान तीन जखमी लोक जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असल्याची माहीती मिळाली आहे.