दुधात भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पावडरची वाहतूक करताना वाहनासह 4,28,000 रु चा माल जप्त..
अॅड. विजय सोनवणे, नगर
दुध प्रत्येकाच्या आवडीचा घटक असला, तरी गेल्या काही वर्षांपासून प्रत्यक्ष दुधाचे उत्पादन आणि प्रकल्पामधून बाहेर येणारा दुधाचा आकडा यामध्ये प्रचंड तफावत आढळून येते. राज्यामध्ये आणि एकूणच देशांमध्ये दुधाची भेसळ मोठ्या प्रमाणावर होत असल्याची सातत्याने चर्चा होते. काही ठिकाणी हे उघडकीस येते, तर काही ठिकाणी हा गोरखधंदा राजरोसपणे सुरू असतो. गेली अनेक वर्षे तो सुरूच आहे! काल कर्जत पोलिसांनी मात्र एका ठिकाणची भांडाफोड केली.. ते ठिकाण आहे, मुसलमान वस्ती.. दुर्गाव ता. कर्जत, जिल्हा अहमदनगर!
गेल्या काही दिवसांपूर्वी कर्जत पोलिसांना गुप्त खबर यांनी एक माहिती दिली होती की, कर्जत तालुक्यातील दुर्गाव येथील मुसलमान वस्तीतून सातत्याने एक गाडी बाहेरगावी जाते आणि येताना दुधामध्ये भेसळ करावयाची पावडर व इतर साहित्य घेऊन येते. त्यानुसार पोलिस या घटनेच्या पाळतीवर होते.
त्यातच पोलिसांना बातमीदाराने माहिती दिली की एक गाडी खेड कडून हे साहित्य घेऊन येताना दिसली आहे. त्यामध्ये दुधात भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारी पावडर आहे आणि ती पावडर घरी जाऊन दुधात पाणी, पावडर व इतर साहित्य टाकून दुधात भेसळ करणार आहेत, अशी माहिती मिळाल्याने कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांना याची कल्पना दिली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सुरेश माने, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, पोलीस हवालदार महादेव गाडे, पोलीस कॉन्स्टेबल सुनील खैरे, गणेश भागडे, महिला होमगार्ड कल्पना घोडके यांचे पथक तयार करून या ठिकाणी माहिती घेऊन तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले.
खेड गावचे शिवारात एक स्विफ्ट कार क्रमांक (एम.एच. 14 बी.के.2772) आली असताना त्यास पोलिसांनी थांबवून त्यातील इसमाकडे त्यांच्या नावाबाबत विचारपूस केली. त्यांनी त्यांची नावे असिफ गफूर शेख, वय 22 वर्ष, 2) अरबाज हसन शेख, (वय 22 वर्ष, दोन्ही रा. मुसलमानवस्ती, दूरगाव, ता. कर्जत) अशी सांगितली.
यानंतर पोलीसांनी सदर वाहनाची झडती घेतली असता गाडीत दुधात भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारी पावडरच्या 25 किलो वजनाच्या 8 गोण्या व प्रत्येक गोणीची किंमत 3500 रुपये प्रमाणे 28 हजार रुपये किमतीच्या आढळून आल्या. त्यावेळी पोलिसांनी वरील इसमांना चौकशी केली असता त्यांनी ही पावडर दुधात भेसळ करण्यासाठी दूरगाव गावी चालवली होती याची पोलिसांची खात्री झाली.
सदरची पावडर ही दुधात भेसळ करण्यासाठी घेऊन जात होते असे कळाल्यानंतर त्यांच्या घरी कशी भेसळ केली जाते याबाबत प्रक्रिया करून दाखविली. पोलिसांनी वरील दोघांना पोलीस ठाण्यात आणून त्यांचे विरुद्ध कर्जत पोलीस स्टेशन अदखलपात्र गुन्हा दाखल केला.
कोर्टाच्या परवानगीनुसार पुढील तपास पोलीस हवालदार तुळशीदास सातपुते हे करीत आहेत. या कारवाईत दूध पावडर आणि गाडी असा 4 लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे..