औदुंबर क्षीरसागर : महान्यूज लाईव्ह
करमाळा : करमाळा तालुक्यातील कुंभेज येथे वनक्षेत्रात मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या बेकायदा जुगार अड्ड्यावर करमाळा पोलिसांनी छापा टाकला, या कारवाईत 1 लाख 2 हजार 480 रुपयांचा ऐवज जप्त केला तर चार जणांना ताब्यात घेतले आहे.
रवींद्र जालिंदर शिंदे ,राहुल विठ्ठल शिंदे, सतीश बळीराम चौगुले, समाधान नरहरी पोळ (सर्व रा. कुंभेज, ता.करमाळा,जि.सोलापुर ) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंभेज हद्दीतील वनक्षेत्रात मागील काही दिवसांपासून बेकायदा जुगार सुरू असल्याची माहिती करमाळा पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार सोमवारी ( 28 ) पोलीस उपनिरीक्षक पवार, पोलीस नाईक मरळे, पोलीस कॉन्स्टेबल लवळे, शेखर बागल आदींनी कुंभेज येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला असता चौघे जन जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले. पोलीसांनी त्यांच्याकडून 7 हजार 480 रुपये रक्कम तसेच मोटरसायकल ,मोबाईल असा एकूण 1 लाख 2 हजार 480 रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी करमाळा पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.