मुंबई: महान्यूज लाईव्ह
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संयमी आणि मिश्किल स्वभावाबद्दल राज्यभरात सुपरिचित आहेत. त्यांना पत्रकारांनी, देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वीच केलेल्या ‘माझ्याकडे सूत्रे द्या, ओबीसीचे आरक्षण मिळाले नाही तर मी संन्यास घेईन’ या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली, तेव्हा बाळासाहेब थोरात यांनी फिरकी घेत अहो, ‘वेगळा विदर्भ झाला नाही, तर लग्नही करणार नाही, असे ते म्हणाले होते त्याचे काय झाले?’ असा प्रतिप्रश्न केला..!
गेल्या काही दिवसांपासून ओबीसी आरक्षणावर रान उठवले आहे. यासंदर्भात पत्रकारांनी थोरात यांना देवेंद्र फडणीस यांच्या वक्तव्याची आठवण करून दिली होती. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे फार गांभीर्याने घेऊ नका. मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर आरक्षणाचा निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले होते. मात्र तसे झाले नाही, सत्तेसाठी काहीही बोलायचे नंतर कृती करायची नाही, हा भाजपचा पहिल्यापासून चा प्रयत्न आहे.
सामान्यांना फसवणे आणि सत्ता मिळवणे हा एकमेव उद्देश ठेवून ते कृती करतात. त्यामुळे त्यांच्या कोणत्याही गोष्टीचा गांभीर्याने घेण्याची गरज नाही असे थोरात म्हणाले.