विशाल कदम : महान्यूज लाईव्ह
फेसबुक वरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणाऱ्या तरुणांपासून सावधान जर ते आपल्या ओळखीच्या नसतील तर फेक अकाऊंट असू शकते अथवा ऑनलाईन सेक्स रॅकेटमध्ये आपण बसू शकतो पुण्यातील एका उच्चभ्रू तरुणाला अशाच एका तरुणीने 18000 रुपयांना गंडा घातला आहे त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे मुंढवा येथील पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे.
पुण्यातील एका उच्चभ्रू तरुणाला फेसबुकवर ओळख झालेल्या तरुणीने सुरवातीला ओळख काढून मग त्याचा नग्न व्हिडीओ शूट करत तो व्हायरल करण्याची धमकी दिली व 18 हजार रुपये उकळले. जानेवारी ते जून 2021 या काळात ही घटना घडली.
मुंढवा येथील हा तरुण कंपनीत नोकरी करत असून, जानेवारीमध्ये त्याच्या फेसबुक अकाउंट वर एका तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्याने ती स्वीकारल्यानंतर दोघात मैत्री निर्माण झाली. तरुणीने त्याला ऑनलाईन सेक्स करण्याचा मोह लावला. या जाळ्यात हा तरुण सापडला.
त्याने तरुणीच्या सांगण्यावरून नग्न अवस्थेत व्हिडिओ कॉल केल्यानंतर तरुणीने हा व्हिडिओ व्हारल करण्याची धमकी देत त्याला पैसे मागण्यास सुरुवात केली. तरुणाने 18 हजार रुपये दिले. पण तरुणी आणखी पैसे देण्यासाठी दबाव टाकत होती. मग मात्र वैतागून या तरुणाने पोलिसांकडे तक्रार केली.
दरम्यान सायबर पोलीस अश्या प्रकारे फसवणूक होत असल्याचे आवाहन करत आहेत. मात्र त्याकडे सरास दुर्लक्ष केले जात आहे. आता ही घटना घडल्यानंतर या तरुणाने न भिता तक्रार दिली आहे. मात्र अनेकजण याला बळी पडत असल्याचे पोलिसांनी सांगितले. फेसबुकवर छान प्रोफाइल असणाऱ्या तरुणी फ्रेंड रिव्हेस्ट पाठवतात आणि त्याद्वारे तरुणांना व्हिडीओ कॉलकरून प्रथम अर्ध नग्न शरीर दाखवतात. त्यालाच हे तरुण भुलतात. मग या तरुणी त्यांना नग्न कॉल करण्यास सांगतात आणि त्यांचा हा व्हिडीओ रेकॉर्ड करतात.