पुण्यातील सहकारनगर परीसरातील धक्कादायक प्रकार…
विशाल कदम : महान्यूज लाईव्ह
उरुळी कांचन – शाळेच्या मित्रांमध्ये असलेले मित्र ची संबंध मित्रत्वाचे संबंध कधीकधी माणसाला पशु बनवतात पुण्यातील सहकार नगर मध्ये असाच एक प्रकार घडला असून यामध्ये पंचवीस वर्षांपूर्वी एकत्र शिक्षण घेतलेले वर्गमित्र 2019मध्ये भेटल्यानंतर वर्ग मैत्रिणीशी एका जणाने संबंध प्रस्थापित केले आणि जवळीक साधत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून तिचा अश्लील व्हिडिओ व्हाट्सअप ग्रुप वर प्रसारित केला.
आंबेगाव पठार येथील उमेश आसू लाल डांगी वय 40 राहणार शिल्प तारा सोसायटी आंबेगाव पठार असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्याच्याविरोधात पीडित महिलेने सरकार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती
उमेश असुलाल डांगी (वय ४०, रा. शिल्पतारा सोसायटी, आंबेगाव पठार) हे त्या उच्चशिक्षीत तरुणाचे नाव असुन, या प्रकरणी पिडीत महिलेने सहकारनगर पोलिसात भारतीय दंड विधायक कलम ३७६ (२) (एन) ५०६ सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी आरोपीला अवघ्या २४ तासात उमेश डांगी याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, उमेश डांगी व या प्रकरणातील ४० वर्षीय पिडीत महिला या दोघांनी पंचविस वर्षापुर्वी सहकारनगर परीसरातील एका शाळेत एकत्र शिक्षण घेतले होते. सदर शाळेने सन २०१९ मध्ये शाळेतील माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात शाळेतील जुने सर्व मित्र-मैत्रिणी आले होते. या विद्यार्थी मेळाव्यात पिडीत महिला आणि आरोपी डांगी यांची भेट झाली.
यावेळी गेटटुगेदरमध्ये भेटलेल्या शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी मिळून एक व्हाट्सअपचा ग्रुप तयार केला होता. दरम्यान गेटटुगेदरनंतर आरोपी डांगी यांनी पिडीत महिलेशी पहिल्यांदा घट्ट मैत्री केली. व त्यानंतर पिडीत महिलेशी जवळीकता वाढवून आरोपीने जबरदस्तीने शाररिक संबंध ठेवले. आणि याचा नकळत व्हिडीओ तयार केला. आरोपीने सदर व्हिडीओ काही दिवसांपूर्वीच शाळेच्या व्हाट्सअप ग्रुपवर व्हायरल केला.
उमेश डांगी याने व्हाट्सअप ग्रुपवर व्हायरल केलेला व्हीडीओ पिडीत महिला मिळताच, संबधित पिडीत महिले सहकारनगर पोलिसात धाव घेतली. सहकारनगर पोलिसांनीही तात्काळ हालचाली करत, उमेश डांगी याला अवघ्या २४ तासाच्या आत अटक केली. तरी, पुढील तपास वरिष्ठ निरीक्षक स्वाती देसाई करीत आहेत.