विशाल कदम, सुरेश मिसाळ :- महान्यूज लाईव्ह
पुणे :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या प्रतीबंधात्मक उपाययोजनांचे उल्लंघन करून हॉटेल, मंगल कार्यालय, शॉपिंग सेंटर आणि हॉकर्स असे व्यवसाय चालविणाऱ्या सात जणांवर इंदापूर पोलिसांनी शुक्रवारी (ता. २५) गुन्हा दाखल केला.
दिपक उर्फ अण्णा सिताराम काटे (रा. सरस्वतीनगर, इंदापुर), अमोल अंकुश पवार (रा. गांधी चौक, नवीन बाजारतळ, अकलुज, ता.माळशिरस जि. सोलापुर), कुणाल शिवाजी चव्हाण (विजय चौक, अकलुज, ता.माळशिरस जि.सोलापुर), प्रदिप चंद्रकांत भोसले (रा.रावतनगर, अकलुज, ता.माळशिरस जि.सोलापुर), किरण रविंद्र साळुंके (रा. भाग्यनगर, भवानीनगर, ता. इंदापुर), अक्षय चंद्रकांत चव्हाण (श्रीरामनगर, भिगवण-रोड, बारामती), सुनिल विठ्ठल रायकर (रा.राउत नगर, अकलुज ता.माळशिरस जि. सोलापुर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरील सातही आरोपी हॉटेल, मंगल कार्यालय, शॉपिंग सेंटर आणि हॉकर हे व्यवसाय करतात. आरोपींनी व्यवसाय करताना कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे.
आरोपींनी स्वत:ही मास्क न लावता बेकायदेशीर रित्या जमाव जमवुन गर्दी केली होती. यामुळे सामान्य जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. म्हणून वरील सातही आरोपींवर भारतीय साथ रोग अधिनियम १८५७ चे कलम ३,४. अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास इंदापर पोलीस करीत आहेत
दरम्यान, जिल्हा (ग्रामीण) पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या आदेशान्वये साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ अन्वये पारीत केलेल्या आदेशाची अवहेलना केलेल्या ३८८ नागरिकांकडून एका दिवसात तब्बल १ लाख ५५ हजार रुपयांचा दंड शुक्रवारी (ता. २५) वसूल करण्यात आला आहे.