विशाल कदम : महान्यूज लाईव्ह
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी एकाचवेळी तीन सराईत गुन्हेगारांवर एमपीडीएनुसार कारवाई केली आहे. गेल्या 9 महिन्यात तबल 26 गुन्हेगारांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी एमपीडीएनुसार कारवाई केली आहे. तिघांवर एकाच दिवशी एमपीडीएची कारवाई होण्याची ही पहिली वेळ आहे.
राकेश प्रकाश साळवे (वय 23, रा. मंगळवार पेठ), साइराज रणाप्रताप लोणकर (वय 21, रा. कोंढवा खुर्द) आणि अजय उर्फ भज्या प्रकाश निकाळजे (वय 27, रा. काकडे वस्ती) अशी एमपीडीएनुसार करवाई केलेल्या तिघांची नावे आहेत.
करवाई केलेल्या आरोपींवर 19 गुन्हे दाखल आहेत. हे तिघेही गुन्हेगार पोलिसांच्या रेकॉर्डवरील आहेत. दरम्यान, त्याबाबत पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी या दोघांवर एमपीडीएनुसार कारवाई करावी असा प्रस्ताव पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना सादर केला होता.
फरासखाना पोलिसांच्या रेकॉर्डवरचा राकेश हा गुन्हेगार आहे. त्याच्यावर दंगा, मारामारी असे 6 गुन्हे दाखल आहेत. पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी त्याच्या एमपीडीएनुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाची पडताळणी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केली. आणि एमपीडीएनुसार तिघांवर कारवाई केली.