• Contact us
  • About us
Wednesday, September 2, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोरोना, अरे तू पोलिसांची प्रतिमाच बदलून टाकली..

Maha News Live by Maha News Live
May 23, 2020
in मराठवाडा, मुंबई, उत्तर महाराष्ट्र, कोकण, क्राईम डायरी, राष्ट्रीय, राजकीय, राज्य, लाईव्ह, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, विदर्भ, व्यक्ती विशेष, Featured
1
कोरोना, अरे तू पोलिसांची प्रतिमाच बदलून टाकली..

संपादकीय

राज्यात कोरोनाची चाहूल लागली..पुढे काही दिवसांतच कोरोनाची भीती दिसू लागली आणि त्या काळातच रस्त्यांवर फिरणाऱ्यांना पोलिसांचीही भीती वाटू लागली. पोलिस मारहाण करतात. अंग सुजवतात या कल्पनेने रस्ते ओस दिसू लागले. रस्त्यांवर फक्त पोलिस आणि चौकाचौकात त्यांची गस्त दिसू लागली. राज्याच्या पोलिसांच्या खात्याच्या मंत्र्यांनी देखील आता पोलिस गप्प बसणार नाहीत, असे स्पष्ट केले आणि पोलिसांना बळ मिळाले. मात्र याचा परिणाम असा झाला की, राज्यातील शहरांमधील चांडाळ चौकडी, जी गुमनाम शहर कसे दिसते, हे पाहण्यासाठी बाहेर पडू लागली होती, त्याला आळा बसला. पुढे हे अति झाल्याचा मुद्दा करीत काहींनी गळे काढण्यास सुरवात केली आणि पोलिसांची तेल लावलेली दंडुकी पुन्हा शांत झाली. मात्र त्यानंतर पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि पोलिसच पुढे सरसावले.

या राज्यात कोरोनाच्या सुरवातीच्या काळात फक्त पोलिस आणि डॉक्टर, परिचारिका एवढेच काम करीत आहेत असेच दिसत होते. शहरेच्या शहरे आणि गावे, खेडी अगदी वाड्यावस्त्यादेखील सुनसान झाल्या होत्या. रात्रीचा दिवस करीत डोळ्यात तेल घालून पोलिसांनी कोरोनाचा एकही पंछी त्यांच्या आखून दिलेल्या कंटेनमेंट झोनमध्ये शिरणार नाही याची तसदी घेतली. ही तसदी घेताना कधीतरी बाहेर उगीच फिरणाऱ्यांच्या चौकशा करता करता कोरोनाग्रस्तांच्याच संपर्कात पोलिसदादा नकळत येऊ लागला आणि कोरोनाची लागण पोलिसांना होत गेली. अर्थात कोरोनाची लागण होऊ शकते याचा धोका मोठा आहे हे माहिती असूनही या राज्यातला हा कोरोनायोध्दा अजिबात मागे हटला नाही. तो लढतच राहीला. या लढाईत १६ कोरोनायोध्दे शहीद झाले. राज्यातल्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत बळी गेलेल्या पोलिसांच्या आकड्यापेक्षा हा आकडा अधिक आहे. आजपर्यंत राज्यात तब्बल १६६६ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. मागील अवघ्या ४८ तासांत २७८ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. अर्थात राज्यात ४७३ जणांनी कोरोनावर आतापर्यंत मातही केली आहे. मात्र तरीदेखील लष्कराच्या भाकऱ्या भाजणाऱ्यांनी स्वतःची किंमत मोजत आयुष्य समर्पित करावे लागलेल्या पोलिसांना नेहमीच आपल्यातीलच काही सहकाऱ्यांच्या पैशाच्या हव्यासापायी टिकेला, बदनामीला सामोरे जावे लागते. अर्थात या कोरोनाच्या काळातही काही पोलिसांनी आपली चाल काही सोडली नाही. एखादे दुकान उघडे दिसायचा अवकाश, त्या दुकानदारावर प्रचंड दबाव आणत तुझ्यावर गुन्हा दाखल करतो, तुला तीन वर्षे शिक्षा होईल अशीच कागदपत्रे रंगवतो असे धमकावत लाचखोरीही केली. मात्र तरीदेखील कोरोनाच्या लढाईत प्रामाणिकपणे लढणाऱ्यांच्या पुढे ही कवडीमोल संख्या आहे.


पोलिसांनी या कोरोनाच्या लढाईत प्रयत्नांची व कामाची शर्थ केली. मात्र स्वतः पोलिसही कोरोनापुढं पालापाचोळाच ठरले. शेवटी पोलिस देखील आहे माणूसच ना? माणसाच्या अंगी असलेले सगळे गुण त्याच्यातही आहेत. पोलिसांना कधी हार तर कधी प्रहार स्विकारावे लागतात. म्हणूनच याही पोलिसांना कोरोनाने ग्रासले. तरीदेखील त्यांनी अजूनही ब्र काढलेला नाही. मिळेल ती सेवा आरामात करीत आहेत. ज्या महाराष्ट्राने पोलिसांना दंडुक्यांनी मारताना पाहिले, त्याच महाराष्ट्राने या पोलिसांना शहरातील नागरिकांना बाहेर पडू नका असे सांगताना गोड गळ्याने गाताना पाहिले.

कोरोनाच्या काळात पोलिसांची प्रतिमाच बदलून गेली. ज्या पोलिसांना देशातील पहिल्या नंबरचे भ्रष्टाचारी खाते असे हिणवले जात होते, त्याच पोलिसांच्या संचलनावेळी पोलिसांवर पुष्पवृष्टी होताना आम्ही पाहिले. गच्चीत, खिडकीत, गॅलरीतून कोणी ना कोणी टाळ्या वाजवून कृतज्ञता व्यक्त करताना आम्ही पाहिले. भीतीपोटी नाही, तर आदरापोटी, अभिमानापोटी आम्ही पोलिसांना सलाम करताना अनेकांना पाहिले. पोलिस खिशातून पैसे काढतात, भांडणानंतर दोन्ही गटाकडून पैसे घेतात अशी ख्याती आम्ही जिथे ऐकली होती, त्याच ठिकाणी भुकेलेल्यांना स्वतःचा डबा देणारा पोलिसदादा आम्ही अनुभवला. स्वतः मधुमेहाने ग्रस्त असतानाही ड्यूटी इज ड्यूटी मानून हटून उभा राहीलेला बंदोबस्तातला पोलिसदादा आम्ही पाहिला. घरातल्या दीड वर्षाचा चिमुकला बाहेर कोरोना आहे, म्हणून जाऊ नको असं रडत असतानाही त्याच्या बापापेक्षा समाजातले अनेक बाप जिवंत राहावेत या भावनेने भावनेला आळा घालत कर्तव्याला श्रेष्ठ मानणारा पोलिस आम्हीच अनुभवला. या कोरोनाने आम्हाला काय शिकवले? तर ज्याच्यावर आपण टिकेचे गोळे फेकतो, त्याच्या चांगुलपणाने भारावून जाऊन त्याच्यावर फुले फेकण्याची वेळ आणली…धन्य आहे तो कोरोना, ज्याने पोलिसांची दुसरी बाजूही समाजापुढे आणली…फक्त हीच बाजू सातत्याने समाजापुढे राहावी, जी पूर्वी काळी बाजू आम्ही ऐकली होती, ती पुन्हा कानी पडू नये, एवढी आदर्श ताकद पोलिसांच्या पाठीशी उभी राहावी हीच यानिमित्ताने अपेक्षा!

Tags: editorialmahanews policemaharashtra police
Next Post
हर्षवर्धन पाटील यांनी मानले जलसंपदाच्या अधिकाऱ्यांचे आभार

हर्षवर्धन पाटील यांनी मानले जलसंपदाच्या अधिकाऱ्यांचे आभार

Comments 1

  1. घनश्याम केळकर says:
    6 years ago

    उत्तम

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

July 13, 2026
पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

July 13, 2026
जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

July 13, 2026
शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

July 13, 2026
उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

पुणे जिल्ह्यातील बावडा, सणसरसह चार मंडळ महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन; बोगस व अनियमित नोंदी प्रकरणी महसूल विभागाची मोठी कारवाई

July 12, 2026
मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

July 12, 2026
आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

July 12, 2026
नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

July 11, 2026
बारामती तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींची रणधुमाळी; १२ जून रोजी सदस्य आरक्षण सोडत!

SIR आणि गुरुजी आडवे आले? १३ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर?  मतदार पुनरीक्षण (SIR) मुळे जानेवारीनंतरच बिगुल वाजण्याचे संकेत!

July 11, 2026
बारामतीतील सायबर गुन्हेगारीची चौथी घटना! आणखी दोघांची 68 लाखाची फसवणूक!

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला; सहा जणांसह इतरांविरुद्ध गुन्हा, कठोर कारवाईचा इशारा

July 10, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group