मुंबई : महान्यूज लाईव्ह
जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे करण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळात काल चर्चा झाली. या निवडणुका पुढे ढकलण्यात अशी विनंती सरकार राज्य निवडणूक आयोगाला करणार असल्याचे सांगण्यात आले.
राज्यात ओबीसी आरक्षणावरून व मराठा आरक्षणावरून तसेच धनगर आरक्षणावरून गदारोळ सुरू आहे त्यातच कोरोना चा प्रभाव देखील तितकासा कमी झालेला नाही. मात्र राज्यात लोकडाऊन शिथिल करण्यात आले आहे, अशा परिस्थितीमध्ये राज्यातील पाच जिल्हा परिषदा व 33 पंचायत समित्या निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. ज्या ठिकाणी पोटनिवडणूक होणार आहेत, त्यापैकी पाच ठिकाणच्या निवडणुकांमुळे ओबीसींच्या आरक्षणाचा विषय पुढे आणला गेला. त्यातच भाजप या विषयावरून महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करते आहे.
या साऱ्या पार्श्वभूमीवर कोरोनाचे निमित्त पुढे करून या निवडणुका पुढे ढकलण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाला राज्य सरकार शिफारस करणार आहे. यासंदर्भात काल मंत्रिमंडळात बैठक झाली. बैठकीत याबाबत चर्चा झाली आणि या चर्चेनंतर या विषयावर एकमत झाले.
राज्याचे मुख्य सचिव सीताराम कोणते हे राज्य निवडणूक आयोगाला यासंदर्भात शिफारस करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती करणार आहेत राज्यातील आषाढी वारी सारखे महत्त्वाचे धार्मिक कार्यक्रम देखील मर्यादित स्वरूपात आयोजित केली जाणार असून या काळात पोटनिवडणुका घेणे योग्य ठरणार नाही अशी भूमिका सरकार कडे मांडणार आहे











