दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : शहरातील भाजी विक्रेते आणि व्यापारी यांचे झालेले वैचारीक गैरसमज दुर करण्यासाठी
वाई नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा डॉ. सौ.प्रतिभा शिंदे, नगरसेवक महेंद्र धनवे, राजेश गुरव, सतीश वैराट, शिवसेनेचे किरण खामकर, व्यापारी आणि भाजी विक्रेते प्रतिनिधी संतोष जमदाडे, युसूफ बागवान, संदीप जगताप, अक्रम बागवान, वैभव हगीर, जुगल बागवान, किरण खामकर, अजीत वनारसे, कार्यालयीन अधिक्षक नारायण गोसावी असे सर्वजण एकत्रीत येऊन सकाळ पासून निर्माण झालेली तणावाच्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांच्या दालनात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ म्हणाल्या, वाई शहरातील लॉकडाऊनचे नियम जिल्हाधिकारी यांनी २१ जूनपासून शिथील केल्यामुळे सर्व प्रकारची दुकाने भाजी मार्केट
खुले झाली आहेत. वाई शहरासह तालुक्यातील नागरीकांनी खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून येत आहे. या गर्दीमध्ये अनेक नागरीक व्यापारी, भाजी विक्रेत्यांकडे कोरोना रोगासाठी घालून दिलेले नियमांचे ऊल्लंघन करुन विनामास्क आणी समांतर अंतर न ठेवता खरेदी करताना आढळून येत आहेत.
अशा बेजबाबदार वर्तनामुळे कोरोना रोगाला आपणच आमंत्रण देत आहोत. यामुळे वाई शहरासह तालुक्यातील गावांमध्ये कोरोना रुग्ण संख्यावाढीचा धोका निर्माण होऊ शकतो. गेल्या १५ महिन्यात आपण सर्वांनी याचा सामना करत वाईट अनुभव घेतला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे
उपचारादरम्यान अनेकांची गैरसोय होत आहे. जवळ पैसे असताना देखील ऑक्सिजन आणि
व्हॅटिलेटर बेड मिळविण्यासाठी नातेवाईकांची
दमछाक आणि फरफटत होतानाचे आपण
सर्वजण त्याचे साक्षीदार आहोत. उपचारादरम्यान शेकडो लोकांचे मृत्यू झाले. त्यात अनेक कुटुंबातील कर्ते पुरुष गेल्याने त्यात अनेक कुटुंबे निराधार झाली आहेत. येणाऱ्या महामारीच्या तिसऱ्या लाटेचे संकट टाळण्यासाठी वाई शहरातील व्यापारी भाजी विक्रेत्यांनी
नगरपरिषदेला साथ द्यावी असे आवाहन मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांनी केले.
यावेळी भाजी विक्रेते प्रतिनिधींनीही वाई नगरपरिषदे पासून भाजी मंडई परिसरासह स्टेट बॅकेपर्यंत आणि बापट बोळ परिसरापर्यंत एकही भाजी विक्रेता बसणार नाही अशी हमी दिली.











