मुंबई : महान्यूज लाईव्ह
देशात पहिल्यांदाच एकाच दिवसात 80.90 लाख जणांना लसीकरण करण्याचा विक्रम काल घडला. सर्वाधिक लसीकरण मध्यप्रदेश मध्ये पंधरा लाख जणांना करण्यात आले.
तिसरी लाट उंबरठ्यावर असल्याच्या शक्यतेमुळे सरकारने लसीकरणासाठी पुढाकार घेतला असून, आंतरराष्ट्रीय योग दिनाचे निमित्त साधून कालपासून विनामूल्य लसीकरण मोहिमेला देशात सुरुवात झाली. 18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण मोफत करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय कालपासून सुरू झाला.
सोमवारी एकाच दिवशी देशांमध्ये 80.95 लाख जणांना लसीकरण करण्यात आले देशात सर्वाधिक लसीकरण मध्यप्रदेश मध्ये करण्यात आले. मध्यप्रदेश मध्ये 15 लाख 42 हजार जणांना; त्याखालोखाल कर्नाटक मध्ये 10 लाख 67 हजार जणांना लसीकरण करण्यात आले. महाराष्ट्रामध्ये काल दिवसभरात तीन लाख 78 हजार 945 जणांना लसीकरण करण्यात आले. सर्वात कमी लसीकरण लक्षद्विप येथे झाले. लक्षद्विप मध्ये 289 जणांना लसीकरण करण्यात आले.











