बारामती : महान्यूज लाईव्ह
पुण्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयाच्या उदघाटनातील गर्दीमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर चौफेर टिका होत असून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष मनोज कनौजिया यांनी अजित पवारांवर घणाघाती टिका केली आहे.
आरक्षण व बहुजन समाजाच्या बैठकींसाठी काही जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असलेल्या गोपीचंद पडळकर यांनी लोका सांगे ब्रम्हज्ञान व आपण कोरडे पाषाण अशी अजित पवारांची स्थिती असल्याची टिका केली. एकीकडे शिवसेना त्यांचा वर्धापनदिन ऑनलाईन करते, मात्र दुसरीकडे याच सरकारमधील उपमुख्यमंत्री मात्र गर्दी करतात, मी आंदोलन केले, तर रात्री तीन वाजेपर्यंत मला पोलिस ठाण्यात ठेवले, मग आता अजित पवार फक्त दिलगीरी व्यक्त करतात ते कसे चालते? आता अजित पवारा्ंवरही गु्न्हा दाखल झाला पाहिजे असे ते म्हणाले.











