इंदापूर : महान्यूज लाईव्ह
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या 51 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिका-यांनी इंदापूर शहरातील फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते, छोटे-मोठे व्यापारी तसेच विना मास्क फिरणारे नागरिकांना पक्षाचे चिन्ह असणारे मास्क स्वतःच्या हाताने घालून मास्कचे महत्व पटवून दिले. यावेळी ५०१ मास्कचे वाटप करण्यात आले.
शहरातील इरिगेशन कॉलनी येथे घरोघरी जांभूळ या फळझाडांची रोपे वाटप करण्यात येवून कॉलनीत असलेले गणेश मंदिर परिसरात विविध फळांची व सावली देणारी रोपे लावण्यात आली.
यावेळी बोलताना तालुका अध्यक्ष स्वप्नील सावंत म्हणाले की, शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी, महागाई कमी करण्यासाठी, रोजगारी हटवण्यासाठी व देशाला वाचवण्यासाठी आम्ही सर्व काँग्रेस कार्यकर्ते राहुलजींना सत्तेत आणण्याचा निर्धार करत आहोत.आजचा दिवस हा संकल्प दिन म्हणून इंदापूर तालुका काँग्रेस कमिटी साजरा करत आहे.
यावेळी इंदापूर शहर अध्यक्ष चमनभाई बागवान, महिला तालुका अध्यक्ष सीमा कल्याणकर, जिल्हा सरचिटणीस झकीर काजी, भगवानराव फासगे, महादेव लोंढे, निवास शेळके, दत्तात्रय देवकर, मिलिंद साबळे, सुफियान खान जमादार, संदीप शिंदे, समीर शेख, तुषार चिंचकर आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते