आमदार यशवंत माने यांनी केले सोमनाथ माळीचे अभिनंदन
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
मोहोळ विधानसभा मतदारसंघातील सरकोली (ता.पंढरपूर) या गावातील सोमनाथ नंदू माळी या युवकाने खडतर परिस्थितीत शिक्षण घेत भारतात दहा मध्ये तर महाराष्ट्रातुन एकमेव निवड होऊन थेट ‘इस्त्रो’ मध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ होण्याचा मान मिळविला. सोमनाथ माळीच्या यशामुळे जगात पंढरपूरचा नावलौकिक झाला आहे असे गौरवोद्गार आमदार यशवंत माने यांनी काढले.
शुक्रवार (दि.१८) रोजी मोहोळ येथे इस्त्रो शास्त्रज्ञ सोमनाथ माळी याचा आमदार यशवंत माने व पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील यांच्या हस्ते सोमनाथचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
यावेळी शेतकरी संघटनेचे पंढरपूर तालुका अध्यक्ष सचिन पाटील, हरी रानगर, बाहुबली सावळे, सोमनाथ चे वडील नंदु माळी उपस्थित होते.











