• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Satara : अत्यावश्यक नसलेली दुकाने व आस्थापना सोमवार ते शुक्रवार सुरु ठेवण्यास परवानगी!
जिल्हाधिकारी शेखरसिंह यांचे सुधारित आदेश

Maha News Live by Maha News Live
June 18, 2021
in आरोग्य, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, Featured
0

खंडाळा : महान्यूज लाईव्ह


कोविड बाधीत रुग्णांचा पॉझीटीव्हीटी रेट व ऑक्सिजन बेडस टक्केवारीच्या निकषानुसार सातारा जिल्हयाचा तिसऱ्या स्तरामध्ये समाविष्ट होत असलेने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नव्याने सुधारित आदेश जारी केले आहेत. यामध्ये अत्यावश्यक नसलेली दुकाने, आस्थापनाही सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते सायं. 4 वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे.

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 व आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 मधील तरतूदीनुसार प्राप्त अधिकारान्वये दिनांक 19 जून 2021 पासून ते पुढील आदेश होईपर्यंत खालीलप्रमाणे आदेश पारित केले आहे. आर्थिक, सामाजिक क्रिया यावर खालील प्रमाणे निर्बध लागू करण्यात येत आहेत.

सर्वसाधारण मार्गदर्शक तत्वानुसार सातारा जिल्हयामध्ये आठवडयाचे सर्व दिवशी सकाळी 5 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जमावबंदी व सायंकाळी 5 वाजलेपासून ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे. त्यामुळे संचारबंदीच्या वेळेत वैध कारणाशिवाय कोणत्याही व्यक्तीस संचार करण्यास मनाई असेल.

सातारा जिल्हयातील सर्व शाळा, महाविदयालये, कोचिंग क्लासेस पुर्णपणे बंद राहतील, ऑनलाईन शिक्षणास परवानगी असेल. तसेच वैदयकीय महाविदयालये, नर्सिंग कोर्सेस चालू ठेवण्यास परवानगी असेल. अत्यावश्यक बाबीची दुकाने, आस्थापना या आठवडयाचे सर्व दिवशी सकाळी 9 ते सायं 4 वाजेपर्यत चालु ठेवण्यास परवानगी असेल. मात्र मेडिकल, औषधांची दुकाने सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत चालू राहतील. हॉस्पीटल मधील मेडिकल, औषधांची दुकाने पुर्णवेळ चालू ठेवण्यास परवानगी असेल.

अत्यावश्यक नसलेली दुकाने,आस्थापना ही सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते सायं. 4 वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी असेल. मॉल, सिनेमागृहे (एक किंवा अनेक पडदी)/ नाटयगृहे इ. पुर्णपणे बंद राहतील. सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायं 4 या कालावधीत हॉटेल, रेस्टॉरंटस् यांना आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने चालू ठेवण्यास परवानगी असेल.

तसेच आठवडयाचे सर्व दिवशी सकाळी 07.00 ते रात्रौ 08.00 या कालावधीत घरपोच पार्सल सेवा चालू ठेवण्यास परवानगी असेल. लॉजिंग, बोर्डींग चालू ठेवण्यास परवानगी असेल. तसेच लॉजिंग मध्ये वास्तव्यास असलेल्या व्यक्तींना सकाळी 07.00 ते सायं 04.00 या कालावधीतच रेस्टॉरंट मध्ये सेवा देता येईल व त्यानंतर त्यांचे वास्तव्य असलेल्या रुम मध्ये सेवा पुरविणे बंधनकारक असेल.

सार्वजनिक जागा/खुली मैदाने/ चालणे/सायकल चालविणे साठी आठवडयाचे सर्व दिवशी सकाळी 05.00 ते सकाळी 09.00 या वेळेत परवानगी असेल. सर्व खाजगी कार्यालयांना सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने चालू ठेवण्यास परवानगी असेल. शासकीय/निम-शासकीय कार्यालये 50 टक्के क्षमतेने चालू ठेवण्यास परवानगी देणेत येत आहे. खुल्या जागेतील क्रिडा विषयक बाबी या आठवडयाचे सर्व दिवशी सकाळी 05.00 ते सकाळी 09.00 या वेळेत चालू ठेवण्यास परवानगी असेल. मात्र कोणत्याही क्रिडासंबंधी स्पर्धा आयोजित करणेस मनाई असेल.

चित्रीकरण – आयसोलेशन बबलमध्येच

चित्रीकरण व वास्तव्य करणे बंधनकारक राहील. कोणतेही गर्दीचे व गर्दी होईल असे चित्रीकरण करता येणार नाही. तसेच आयसोलेशेन बबलच्या बाहेर सायंकाळी 5 नंतर कोणालाही संचार, प्रवास करता येणार नाही. सामाजिक सांस्कृतिक, धार्मिक/प्रार्थना स्थळे, करमणुक कार्यक्रम, मेळावे हे जागेच्या इत्यादी पुर्णपणे बंद राहतील. तथापि सर्व धार्मिक आणि प्रार्थना स्थळामध्ये धार्मिक सेवा करणारे सेवेकरी यांना त्यांच्या पारंपारीक / धार्मिक सेवा करता येतील. यावेळी कोणत्याही बाहेरील भक्तांस प्रवेश असणार नाही. मात्र शासकीय कार्यक्रमांसाठी जागेच्या 50% क्षमतेने आयोजीत करणेस परवानगी असेल.

सातारा जिल्हयातील प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कोणतेही कार्यक्रम आयोजीत करणेस मनाई आहे. तथापि, प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर क्षेत्रात खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय/हॉल/सभागृह, घर व घराच्या परिसरात, एक हॉल, कार्यालयामध्ये एकच लग्न समारंभ दोन तासापेक्षा जास्त नसेल इतक्या कालावधीत 25 लोकांच्या (संपुर्ण कार्यक्रमासाठी भटजी, वाजंत्री, स्वयंपाकी/वाढपी इ. सह) मर्यादेत लग्न आयोजन करणेकामी संबंधित तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील.

तसेच जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांचेकडील दि. 02 मार्च 2021 च्या आदेशामधील अटी व शर्तींचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहील. याबाबत उल्लंघन झाल्यास संबंधित व्यवस्थापन यांचेकडून प्रथम वेळी 25 हजार रुपये दंड तसेच दुसऱ्या वेळी भंग झाल्यास 1 लाख रुपये व फौजदारी कारवाई करावी.

तसेच कोविड -19 च्या अनुषंगाने निर्गमीत अटी व शर्तीचे पालन न करणाऱ्या किंवा या निर्बंधाचा भंग करणाऱ्या कुटूंबास 25 हजार रुपये इतका दंड आकारला जाईल. शासनाचे दिनांक 15 मार्च 2021 व 17 मार्च 2021 चे आदेशातील तरतुदीनुसार, जोपर्यत केंद्र शासनाचे आपत्ती व्यवस्थापनाकडून कोविड- 19 साथीचा रोग आटोक्यात आलेचे जाहिर होत नाही. तोपर्यत संबंधित मालमत्ता बंद राहील.

जास्तीत जास्त 20 नातेवाईक/ नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यविधी व दशक्रिया विधी करणेस परवानगी असेल. बैठका/निवडणुक – स्थानिक संस्थांच्या, सहकारी संस्थाच्या सर्वसाधारण सभा या ज्या ठिकाणी सभा होणार अशा ठिकाणच्या मर्यादेच्या 50 टक्के क्षमतेने घेणेस परवानगी असेल.

सर्व बांधकामांना परवानगी असेल. ज्या मजुरांची राहण्याची व्यवस्था बांधकामाच्या ठिकाणी असेल त्यांनी बांधकाम करणेस हरकत नाही तथापि, ज्या मजूरांची राहण्याची व्यवस्था बांधकामाच्या ठिकाणी नसेल अशा मजूरांनी सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत बांधकाम ठिकाण सोडावे.

शेतकरी यांना आवश्यक असणारी बियाणे, खते, शेती विषयक उपकरणे व त्यांची दुरुस्ती व देखभाल पुरविणाऱ्या सेवांची दुकाने आठवडयाचे सर्व दिवशी सायं. 04.00 वा पर्यत चालु ठेवण्यास परवानगी असेल. तसेच शेती विषयक (मशागत) करणेची सेवा करणेस आठवडयाचे सर्व दिवशी सायंकाळी 04.00 वा पर्यत परवानगी असेल.

ई-कॉमर्सच्या वस्तू तसेच सेवा नियमितपणे चालू ठेवण्यास परवानगी असेल. व्यायामशाळा, केश कर्तनालय, सौदर्य केंद्रे, स्पा, वेलनेस सेंटर ही आसन क्षमतेच्या 50% क्षमतेने फक्त अगोदर भेटीची वेळ (prior Appointment) ठरवून तसेच विना-वातानूकुलीत (Non AC) जागेसाठी सायंकाळी 04.00 वा पर्यत चालु ठेवण्यास परवानगी राहील.

सार्वजनिक परिवहन बसेस सेवा या 100 टक्के क्षमतेने चालु ठेवण्यास परवानगी राहील. कोणत्याही प्रवाशास उभे राहून प्रवास करणेची परवानगी नसेल. मालवाहतूक वाहनामधून वाहन चालक, मदतनीस, क्लिनर किंवा इतर असे एकुण जास्तीत जास्त 3 व्यक्तीस प्रवासास परवानगी असेल. खाजगी वाहने, टॅक्सी, बसेस, लांब पल्ल्याच्या रेल्वे द्वारे प्रवाशांचा आंतर जिल्हा प्रवास नियमीत सुरु राहील – परंतू सदर वाहनामधून स्तर पाच मध्ये समाविष्ठ असलेल्या जिल्हयामधून येणाऱ्या प्रवाशास ई पास बंधनकारक असेल.

उत्पादन क्षेत्र – निर्यातभिमुख यंत्रणा की ज्यामध्ये सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग ज्यांना निर्यात बंधन पूर्ण करण्याची आवश्यकता आहे अशा यंत्रणा नियमितपणे चालू ठेवण्यास परवानगी असेल. जीवनावश्यक वस्तू उत्पादन घटक (कोणत्याही वस्तूसाठी कच्चा माल / पॅकेजिंग तयार करणार आवश्यक वस्तू आणि घटक, वस्तू आणि संपूर्ण पुरवठा साखळी), सतत प्रक्रिया उदयोग की जे तातडीने थांबवता येत नाहीत आणि आवश्यक वेळ दिल्याशिवाय पुन्हा सुरु होवू शकत नाहीत.

राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण यांचे अनुषंगाने महत्वाच्या घटकाची निर्मिती करणारे उदयोग,डाटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर, आयटी क्षेत्रातील गंभीर पायाभूत सुविधांना सहाय्य करणारे प्रदाता – अशा यंत्रणा नियमितपणे चालू ठेवण्यास परवानगी असेल.

उत्पादन – उत्पादन क्षेत्रातील इतर उत्पादन घटक जे आवश्यक, ‍निरंतर प्रक्रिया किंवा निर्यात देणाऱ्या घटकाअंतर्गत येत नाहीत अशा यंत्रणा 50% कर्मचाऱ्यांचे मर्यादेत चालू ठेवण्यास परवानगी असेल. सदर कर्मचारी यांची हालचाल TRANSPORT BUBBLE मध्ये असणे बंधनकारक राहील. शिवभोजन थाळी योजना चालू ठेवण्यास परवानगी असेल.

सर्वसाधारण मार्गदर्शक सुचना

ज्या आस्थापनांना सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी देणेत आली आहे., त्या आस्थापनावरील कर्मचारी यांना त्यांचे घरी पोहोच होणेसाठी सायं 05.00 वाजेपर्यंत प्रवास करणेस परवानगी असेल. स्तर पाच मध्ये समाविष्ठ असलेल्या जिल्हयामधून येणाऱ्या प्रवाशांना वैयक्तीक स्वतंत्र पास असणे आवश्यक आहे. प्रवाशांच्या वाहनांना स्वतंत्र पासची आवश्यकता असणार नाही. कोविड-19 व्यवस्थापनासाठी आवश्यक असणारी शासकीय कार्यालये आणि अत्यावश्यक सेवा 100% कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसह चालू राहतील. इतर सरकारी कार्यालयांबाबत सबंधित विभाग प्रमुख हे कर्मचाऱ्यांच्या आवश्यक जास्तीच्या उपस्थिती बाबतचा निर्णय स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या परवानगीने घेवू शकतील.

अत्यावश्यक सेवांमध्ये खालील बाबींचा समावेश असेल –

रुग्णालये, निदान केंद्रे (Diagnostic Centers), दवाखाने, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने (Pharmacies) औषध कंपन्या, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा व सदर सेवा पुरविणारी उत्पादक केंद्रे, वाहतूक व पुरवठा साखळीस परवानगी असेल. लस,सॅनिटायझर, मास्क व वैद्यकीय उपकरणे व अशा सेवांना लागणारा कच्चा माल व त्याच्याशी सबंधित उत्पादन व वितरण. व्हेटरीनरी हॉस्पिटल्स, अॅनिमल केअर शेल्टर्स व पेट फुड शॉप्स. वनविभागाने घोषित केल्यानुसार वनाशी संबंधित सर्व कामकाज. किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी कन्फेक्शनरी, मटन, चिकन, अंडी, मासे दुकाने, इत्यादींची सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची दुकाने. कोल्ड स्टोरेज आणि गोदाम सेवा.

सार्वजनिक वाहतूक – विमान, रेल्वे, टॅक्सी, ऑटो आणि सार्वजनिक बस. राज्य व स्थानिक प्राधिकरणांचे मान्सूनपूर्व उपक्रम / सातारा जिल्हयाचे पश्चिम भागातील खाजगी व्यक्तींची मान्सूनपूर्व कामे. स्थानिक प्राधिकरणाद्वारे सर्व सार्वजनिक सेवा. भारतीय रिझर्व्ह बँक आणि आरबीआयने नियुक्त केलेल्या आवश्यक सेवा. सेबीच्या सर्व कार्यालये बाजारातील मूलभूत सुविधा संस्थांसारख्या स्टॉक एक्सचेंजेस, डिपॉझिटरीज, क्लियरिंग कॉर्पोरेशन आणि इतर मध्यस्थी सेबीकडे नोंदणीकृत आहेत. दूरसंचार सेवांच्या दुरुस्ती / देखभालीसाठी आवश्यक सेवा, माल वाहतूक,पाणीपुरवठा सेवा,शेती संबंधी उपक्रम, बियाणे, खते,उपकरणे व त्याची दुरुस्ती यासह कृषी क्षेत्राचे अखंड निरंतरता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक असणारी कृषी संबंधित क्रियाकलाप आणि त्याशी संबंधित संलग्न उपक्रम. सर्व वस्तूंची निर्यात-आयात. ई-कॉमर्स (केवळ आवश्यक वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यासाठी),अधिकृत मिडिया,पेट्रोल पंप आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने; गंभीर पायाभूत सुविधा आणि सेवांना आधार देणारी डेटा सेंटर क्लाउड सर्व्हिसेस/आयटी सेवा सरकारी आणि खाजगी सुरक्षा सेवा. विदयुत आणि गॅस पुरवठा सेवा. ATM,s ,पोस्टल सेवा, कस्टम हाऊस एजंट्स ,परवानाकृत मल्टि मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर जे लस , जीवनरक्षक औषधे , फार्मास्युटिकल उत्पादनांच्या हालचालीशी संबंधित आहेत.

कोणत्याही अत्यावश्यक सेवेसाठी कच्चा माल, पॅकेजिंग सामग्रीची निर्मिती करणारे घटक. व्यक्तींसाठी तसेच संस्थांसाठी पावसाळ्याच्या हंगामासाठी साहित्याच्या उत्पादनामध्ये गुंतलेली यंत्रणा. मालवाहतूक व अत्यावश्यक सेवेतील वाहनांच्या दुरुस्तीसाठी गॅरेज, स्पेअर पार्ट, पंक्चर दुकाने.

सातारा जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या सकाळी 07.00 वा. ते दुपारी 02.00 वा. पर्यंत सुरु राहतील. बाजार समित्यांच्या ठिकाणी फक्त घाऊक किंवा किरकोळ विक्रेत्यांनाच तेथे जावून माल घेता येईल, कोणत्याही वैयक्तीक व्यक्तीस बाजार समितीच्या ठिकाणी प्रवेश नसेल या शर्तीसह सुरु राहतील. याबाबत नियंत्रण करण्याची जबाबदारी त्या त्या स्थानिक नागरी, ग्रामीण प्रशासन संस्थेची असेल. स्थानिक आपत्ती व्यवस्थापनाद्वारे आवश्यक सेवा म्हणून नियुक्त केलेल्या कोणत्याही सेवा.

Next Post

वाई येथील अर्पण ग्रुपतर्फे पर्यावरण संवर्धणासाठी हजारो सीडबॉल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group